वांग बटाट्याची मसालेदार भाजी (वांग बटाटा भाजी, वांग बटाटा भाजी रेसिपी, वांग बटाटा सुकी भाजी, वांग्याची भाजी कशी बनवतात, वांग्याची भाजी कशी करायची, वांग्याची भाजी रेसिपी, वांगी भाजी, वांग्याची सुकी भाजी रेसिपी)
वांग बटाट्याची मसालेदार भाजी वांग बटाट्याची मसालेदार भाजी Links To Read Blog In Other Languages On Wang Batatyachi Masaledar Bhaji : Blog On Wang Batatyachi Masaledar Bhaji In English पदार्थाविषयी माहिती : वांग बटाट्याची मसालेदार भाजी हा पदार्थ चवीला तिखट आणि चवदार असतो. कोकण विभागात वांग बटाट्याची मसालेदार भाजी ही तांदळाच्या किंवा नाचणीच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या भाकरीसोबत किंवा गहूच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या चपातीसोबत खाण्यासाठी बनवली जाते. वांग म्हटलं तर बहुतेक सर्व जण नाक मुरडतात कारण वांग्याची भाजी बहुतेक जणांना आवडत नाही, म्हणून जर वांग्या ची भाजी बनवताना त्यात बटाटा घातला तर तीच भाजी सर्वजण आवडीने खातात. भाजीतील मीठ, मसाला आणि कोकण विभागात प्रसिद्ध असलेला जेवणात वापरला जाणारा गरम मसाला यामुळे भाजीची चव अधिक वाढते. कोकणात वांग बटाट्याची भाजी ही वाटण (कोकणात वाटण म्हणजे वाटप) घालून देखील बनवली जाते, वाटण घातल्यामुळे भाजीची चव आणखी उत्कृष्ट लागते. कोकण विभागात वांग बटाट्याच्या भाजीत वाटण न घालता बनवली जाणारी भाजी ही वांग बटाट्याची मसालेदार भाजी म्हणून प्रसिद्ध जाते. विशेषत