मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

मसूरच्या डाळीपासून बनवलेली तिखट डाळ (मसूर डाळ, मसूर डाळीचे फायदे व तोटे, मसूर दाल बेनिफिट्स, मसूरच्या डाळीची रेसिपी, मसूर डाळ फायदे, मसूर डाळ रेसिपी, मसूर डाळ कशी बनवायची, मसूर डाळ खाण्याचे फायदे, मसूर डाळ माहिती, लाल मसूर की दाल, तिखट डाळ, तिखट डाळ कशी बनवायची, तिखट डाळ बनवायची रेसिपी)

मसूरच्या डाळीपासून बनवलेली तिखट डाळ

मसूरच्या डाळीपासून बनवलेली तिखट डाळ (मसूर डाळ, मसूर डाळीचे फायदे व तोटे, मसूर दाल बेनिफिट्स, मसूरच्या डाळीची रेसिपी, मसूर डाळ फायदे, मसूर डाळ रेसिपी, मसूर डाळ कशी बनवायची, मसूर डाळ खाण्याचे फायदे, मसूर डाळ माहिती, लाल मसूर की दाल, तिखट डाळ, तिखट डाळ कशी बनवायची, तिखट डाळ बनवायची रेसिपी)
मसूरच्या डाळीपासून बनवलेली तिखट डाळ

Links To Read Blog In Other Languages On Masoorchya Dalipasun Banavleli Tikhat Dal :

Blog On Masoorchya Dalipasun Banavleli Tikhat Dal In English

पदार्थाविषयी माहिती :

मसूरच्या डाळीपासून बनवलेली तिखट डाळ हा पदार्थ चवीला आंबट तिखट असतो. मसूरची तिखट डाळ ही अतिशय पौष्टिक आणि चवदार असून गरमागरम भातासोबत, चपातीसोबत खाण्यासाठी फारच छान लागते. कोकण विभागात मसूरची डाळ तिखट बनवण्यासाठी त्यात हिरव्या मिरच्यांऐवजी मसाला आणि गरम मसाला वापरला जातो. मसाला आणि गरम मसाला वापरल्यामुळे मसूरच्या तिखट डाळीला खूपच उत्कृष्ट रंग येऊन डाळीचा स्वाद अधिक वाढतो. कोकण विभागात घराघरात जेवणामध्ये भातासोबत खाण्यासाठी तूरीची गोडी डाळ, तूरीची तिखट डाळ बनवली जाते, त्याबरोबर डाळीचा आणखी एक उत्कृष्ट पर्याय म्हणजे मसूरची तिखट डाळ हा आहे, कारण मसूरच्या डाळीपासून बनवलेली डाळ ही खूप स्वादिष्ट असते. कोकणात मसूरच्या डाळीपासून बनवलेली तिखट डाळ ही गरमागरम भातासोबत, चपाती तसेच भाकरीसोबत खाण्यासाठी विशेष बनवली जाते, त्यामुळे मसूरच्या डाळीपासून बनवलेली तिखट डाळ ही कोकण विभागात फार प्रसिद्ध आहे.      

विशेषता :

मसूरच्या डाळीचा जेवणात फारसा वापर केला जात नाही, परंतु मसूरच्या डाळीची विशेषता ही की मसूरच्या डाळीचे अनेक औषधी फायदे आहेत. मसूरच्या डाळीत बरीच पोषक तत्वे असतात, जी संतुलित आहारासाठी खूप फायदेशीर आहेत. मसूरच्या डाळीत तंतुमय पदार्थ आणि प्रथिने यांचे प्रमाण अधिक प्रमाणात असल्यामुळे वजन वाढवण्यावर नियंत्रण ठेवते, मसूरच्या डाळीचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील कॉलेस्टेरॉल कमी होऊन हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत होते, डाळीतील तंतुमय पदार्थ बद्धकोष्टता टाळण्यास साहाय्य करतात, डाळीतील पेप्टाइड्स शरीरातील रोगपरतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. मसूर डाळ खाल्ल्याने पोट, घसा, यकृत, स्तन इत्यादी प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका देखील कमी होऊ शकतो. मसूरच्या डाळीत कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखी खनिजे असल्यामुळे दात आणि हाडे मजबूत करण्यासाठी मदत करते. मेंदूशी संबंधित समस्यांपासून बचाव करण्यासाठी लाल मसूरची डाळ ही अतिशय उपयुक्त असते. मसूरच्या डाळीतील प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्स केसांना मुळापासून मजबूत करून केसगळती रोखण्यासाठी मदत करतात. मसूरच्या डाळीत असणाऱ्या बऱ्याच गुणधर्मांमुळे मसूरच्या डाळीचा आहारात समावेश करणे फार महत्वाचे आहे. मसूरच्या तिखट डाळीत टोमॅटो घातल्यामुळे डाळीचा उग्रपणा कमी होऊन हलका आंबटपणा येतो, पण कोकण विभागात डाळीची आंबट चव किंचित वाढवण्यासाठी त्यात योग्य प्रमाणात कोकम घातले जातात. जेवणात आंबट चवीसाठी कोकमाचा वापर ही कोकणाची खासियत आहे. डाळीत कोकम घातल्यामुळे डाळ आणखी रुचकर आणि स्वादिष्ट बनते. बहुतेक लोकांना तिखट आंबट अशी मिश्र चव असणारे पदार्थ खाण्यासाठी फार आवडतात, त्यामुळे कोकणात प्रसिद्ध असणाऱ्या मसूरच्या डाळीपासून बनवलेली तिखट डाळ ही बहुतेक लोकांची आवडती डाळ ठरू शकते.  

साहित्य :

१) तेल
२) मोहरी
३) सात ते आठ कढीपत्त्याची पाने
४) जिरे
५) बारीक कापून घेतलेल्या पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या
६) बारीक कापून घेतलेला आल्याचा अर्धा तुकडा
७) हिंग
८) हळद
९) मसाला
१०) गरम मसाला
११) दोन बारीक चिरलेले कांदे
१२) दोन बारीक चिरलेले टोमॅटो
१३) कोकम
१४) मीठ
१५) दोन वाटी मसूरची डाळ
१६) पाणी
१७) कोथिंबीर

कृती :

१) मसूरच्या डाळीपासून तिखट डाळ बनवण्यासाठी पहिल्यांदा दोन वाटी मसूरची डाळ पाण्याने तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर एका कूकर मध्ये ही धुवून घेतलेली मसूरची डाळ घ्या, त्यात दोन बारीक चिरलेले टोमॅटो घाला. दोन वाटी डाळ घेतल्यामुळे ही डाळ शिजवण्यासाठी कूकर मध्ये अडीज ग्लास पाणी घाला. मसूरची डाळ चवीला उग्रट असल्यामुळे डाळ शिजवताना त्यात टोमॅटो घातला जातो, त्यामुळे डाळीचा उग्रपणा कमी होऊन डाळीला किंचित आंबट चव येते. मग कूकरचे झाकण लावून गॅस चालू करून त्यावर कूकर ठेवा. मसूरची डाळ शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि कूकरच्या एका शिटीत मसूरची डाळ अगदी व्यवस्थित शिजेल. जर कूकरच्या जास्त शिट्या काढल्या तर मसूरची डाळ अधिक शिजून त्याचे पातळ पिठाचे सारण तयार होईल म्हणून मसूरची डाळ शिजवण्यासाठी कूकरची फक्त एक शिटी काढून घ्या.
२) कूकरची एक शिटी काढून घेतल्यानंतर गॅस बंद करा आणि मग पाच ते सात मिनिटांनी कूकरची शिटी चमचाच्या सहाय्याने वर करून त्यातील वाफ काढून घ्या आणि वाफ निघाल्यानंतर कूकरचे झाकण उघडा.
३) अशा पद्धतीने मसूरची डाळ व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस चालू करून त्यावर एक मोठा टोप ठेवा, टोप व्यवस्थित तापल्यानंतर त्यात सात ते आठ चमचे तेल घाला, अर्धा चमचा मोहरी घाला. तेलात मोहरी व्यवस्थित तडतडल्यावर गॅस मंद आचेवर करून त्यात सात ते आठ कढीपत्त्याची पाने, अर्धा चमचे जिरे, चिमुटभर हिंग घाला. फोडणीत मोहरी, कढीपत्ता, जिरे आणि हिंग यांचा सुगंध येताच त्यात बारीक कापून घेतलेल्या पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या आणि बारीक कापून घेतलेले आले घाला. ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घ्या.
४) त्यानंतर या फोडणीत दोन बारीक चिरलेले कांदे घाला, कांदा तेलात लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या.
५) कांदा लालसर झाल्यानंतर फोडणीत अर्धा चमचा हळद घाला. मसूरच्या तिखट डाळीत हळद घातल्यामुळे मसूरच्या डाळीला हळदीचा सुंदर स्वाद आणि हलका पिवळसर रंग येईल. त्यानंतर या फोडणीत दोन चमचे मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घाला. फोडणीतील मसाला आणि गरम मसाला करपून जाऊ नये म्हणून त्यात लगेचच अर्धा कप पाणी घाला. फोडणीत किंचित पाणी घातल्यामुळे त्याला त्वरित उकळी फुटेल.
६) त्यानंतर या टोपातील फोडणीत कूकर मधील मसूरची शिजवून घेतलेली डाळ घाला, नंतर त्यात चवीनुसार मीठ घाला आणि मसूरची डाळ फार घट्ट आणि जास्त पातळ होऊ नये यासाठी आवश्यकतेनुसार मसूरच्या डाळीत पाणी घाला. यानुसार मसूरची डाळ व्यवस्थित ढवळून घ्या, जेणेकरुन डाळीत सर्व फोडणी आणि मीठ सर्वत्र बरोबर लागेल. मसूरच्या तिखट डाळीचा उग्रपणा किंचित कमी करण्यासाठी आपण त्यात टोमॅटो घातला, परंतु तिखट डाळीतील उग्रता पूर्ण घालवण्यासाठी आणि डाळीला आंबटपणा येण्यासाठी त्यात चार ते पाच कोकम घाला, त्यामुळे मसूरच्या डाळीची चव दुप्पटीने आणखी वाढेल. मसूरच्या डाळीत हिरव्या मिरच्यांऐवजी मसाला आणि गरम मसाला वापरल्यामुळे डाळीला तिखट चव येऊन डाळ अधिकच उत्कृष्ट आणि मसालेदार बनेल.
७) मग गॅस किंचित वाढवून घ्या आणि मसूरच्या डाळीत चमचा उलटा करून घालून ठेवा. (नोंद : डाळीत चमचा उलटा करून ठेवल्याने डाळीला उकळी आल्यावर डाळ ओतू जाणार नाही. ) अशा तऱ्हेने मसूरची डाळ पाच ते दहा मिनिटे उकळी येण्यासाठी ठेवून द्या. मसूरच्या डाळीला उकळी येण्यास सुरुवात होऊन मसूरच्या डाळीचा सुगंध दरवळेल. एकदा का मसूरच्या डाळीला व्यवस्थित उकळी येऊन डाळ शिजली की काळजीपूर्वक डाळीतील चमचा रुमालाच्या साहाय्याने बाहेर काढून गॅस बंद करा आणि मग डाळीवर बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घाला.
८) यानुसार मसूरची मसालेदार आणि पौष्टिक अशी गरमागरम तिखट डाळ मऊ आणि लुसलुशीत भातासोबत खाण्यासाठी तयार होईल.

चव :

कोकमामुळे किंचित आंबट पण मसाल्यामुळे तिखट आणि स्वादिष्ट