मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

बटाट्याचे काप करून केलेली मसालेदार भाजी (बटाट्याची भाजी, बटाट्याची भाजी कशी बनवतात, बटाट्याची रेसिपी, बटाटा भाजी, आलू ची भाजी, बटाट्याची भाजी कशी बनवायची, बटाट्याची भाजी रेसिपी, बटाट्याची भाजी दाखवा, बटाट्याची भाजी कशी करायची दाखवा, बटाट्याची भाजी कशी बनवतात ते दाखवा, बटाट्याची सुकी भाजी)

बटाट्याचे काप करून केलेली मसालेदार भाजी

बटाट्याचे काप करून केलेली मसालेदार भाजी (बटाट्याची भाजी, बटाट्याची भाजी कशी बनवतात, बटाट्याची रेसिपी, बटाटा भाजी, आलू ची भाजी, बटाट्याची भाजी कशी बनवायची, बटाट्याची भाजी रेसिपी, बटाट्याची भाजी दाखवा, बटाट्याची भाजी कशी करायची दाखवा, बटाट्याची भाजी कशी बनवतात ते दाखवा, बटाट्याची सुकी भाजी)
बटाट्याचे काप करून केलेली मसालेदार भाजी

Links To Read Blog In Other Languages On Batatyache Kaap Karun Keleli Masaledar Bhaji :

Blog On Batatyache Kaap Karun Keleli Masaledar Bhaji In English

पदार्थाविषयी माहिती :

बटाट्याचे काप करून केलेली मसालेदार भाजी हा पदार्थ कोकण विभागात विशेष प्रसिद्ध आहे. कोकणात बटाट्याच्या कापांची मसालेदार भाजी ही विशेषतः तांदळाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या भाकरीसोबत किंवा गहूच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या चपातीसोबत खाण्यासाठी बनवली जाते. बटाट्याच्या कापांची भाजी ही चवीला तिखट असते फार उत्कृष्ट लागते. जर घरात फक्त बटाटी शिल्लक असतील आणि नाश्त्याला किंवा जेवणावर बनवण्यासाठी बटाट्यांऐवजी कोणतीही इतर भाजी उपलब्ध नसेल तर कोकणात खास प्रसिद्ध असलेली बटाट्याचे काप करून केलेली मसालेदार भाजी ही नाश्त्याचा किंवा जेवणाचा उत्तम बेत ठरू शकेल.

विशेषता :

बटाट्याचे काप करून केलेली मसालेदार भाजी या भाजीची मुख्य विशेषता अशी आहे की ही भाजी चवीला तिखट असल्यामुळे कोकणात गरमागरम भात आणि गोडी डाळीसोबत देखील या भाजीचा आस्वाद घेतला जातो कारण कोकणात तिखट भाजी आणि गोडे वरण हे बहुतेक लोकांच्या जेवणातील उत्तम संयोजन मानले जाते. बटाटा ही बहुतेक लोकांची आवडती भाजी असल्यामुळे बरेच लोक बटाट्याची भाजी मोठ्या आवडीने खातात. बटाट्याचे काप करून केलेली मसालेदार भाजी या पदार्थाची आणखी एक विशेषता अशी की ही भाजी वाफेवर शिजवली जाणारी भाजी आहे आणि त्यामुळे ही भाजी त्वरित होते, जर घरात अन्य कोणतीही भाजी बनवण्यासाठी कंटाळा आला असेल किंवा वेळेची मर्यादा असेल तर बटाट्याचे काप करून केलेली मसालेदार भाजी ही फार पटकन होणारी आणि वेळ वाचवणारी अत्यंत चविष्ट आणि मसालेदार भाजी आहे.

साहित्य :

१) तेल
२) मोहरी
३) जिरे
४) आठ ते दहा कढीपत्त्याची पाने
५) एक बारीक चिरलेला कांदा
६) हळद
७) मसाला
८) मीठ
९) सात ते आठ बटाटी
१०) कोथिंबीर

कृती :

१) बटाट्याचे काप करून केलेली मसालेदार भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा सात ते आठ बटाटी स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून बटाट्यांच्या सालीला असणारी माती निघून जाईल. बटाटी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर सोलण्याच्या साहाय्याने या बटाटयांची साल काढून घ्या, मग विळीवर किंवा सुरीच्या मदतीने या बटाटयांचे गोलाकार असे बारीक काप करून घ्या. एका मोठ्या टोपात पाणी घेऊन त्या टोपातील पाण्यात या बटाट्यांचे सर्व काप भिजत घालून ठेवा. बटाट्याचे काप पाण्यात भिजत घातल्याने बटाट्यांच्या कापांचा रंग लालसर होणार नाही आणि बटाट्यांच्या कापातील अतिरिक्त स्टार्च देखील निघून जाईल.
२) त्यानंतर गॅस चालू करून त्यावर एक मोठी कढई ठेवा, कढई चांगली तापल्यानंतर त्यात दहा ते बारा चमचे तेल घाला, मग गॅस मंद आचेवर करून त्यात अर्धा चमचा मोहरी घाला, मोहरी तेलात व्यवस्थित तडतडल्यावर फोडणीत मोहरीचा खूप छान सुगंध दरवळेल, मग त्यात अर्धा चमचा जिरे आणि आठ ते दहा कढीपत्त्याची पाने घाला. फोडणीत मोहरी, जिरे, कढीपत्ता व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात लगेचच एक बारीक चिरलेला कांदा घाला.
३) कढईतील ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घ्या, तेलात कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या. कांदा लालसर होईस्तोवर दुसऱ्या बाजूला टोपातील पाण्यात भिजत ठेवलेले बटाट्यांचे गोलाकार काप यातील पाणी काढून टाका.
४) कांदा तेलात लालसर झाल्यानंतर त्यात चिमूटभर हळद, एक चमचा मसाला घाला. (नोंद : ज्यांना जास्त तिखट आणि मसालेदार पदार्थ खायला आवडतात, त्यांच्यासाठी आवडीनुसार तिखटासाठी भाजीतील फोडणीत आणखी मसाला घालता येऊ शकतो. ) यानंतर लगेचच टोपातील पाणी काढून घेतलेले बटाट्यांचे गोलाकार काप या फोडणीत घाला. बटाट्यांचे काप घालताना त्यात अजिबात पाणी असणार नाही याची विशेष काळजी घ्या, कारण बटाट्याच्या कापांची भाजी ही वाफेवर व्यवस्थित शिजेल, त्यामुळे बटाट्याची भाजी शिजवण्यासाठी त्यात अजिबात पाणी घालू नका.
५) मग त्यात चवीनुसार मीठ घालून सर्व भाजी व्यवस्थित परतून घ्या म्हणजे सर्व फोडणी, मसाला सर्वत्र बटाट्यांच्या कापांना व्यवस्थित लागेल. पुढे गॅस मध्यम आचेवर करून बटाट्यांच्या कापांची भाजी शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवा. मग तीन ते चार मिनिटांनी काळजीपूर्वक कढईवरील झाकण काढून बघा, भाजीला पाणी सुटले असेल याचा अर्थ बटाटी अजून शिजलेली नाहीत म्हणून बटाट्यांच्या कापांची भाजी चमचाच्या साहाय्याने व्यवस्थित परतून घ्या. नंतर भाजी वाफेवर शिजण्यासाठी पुन्हा कढईवर झाकण ठेवा.
६) यानंतर गॅस मंद आचेवर करून घ्या, कारण बटाट्याची मसालेदार भाजी वाफेवर शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही, जर गॅस मध्यम आचेवर करून भाजी शिजवली तर ती करपून जाण्याची शक्यता असते. यासाठी मंद आचेवर भाजी शिजण्यासाठी ठेवून द्या. नंतर पाच ते दहा मिनिटांंनंतर काळजीपूर्वक कढईवरील झाकण काढून बघा, भाजीतील पाणी निघून गेले असेल आणि भाजीचा खमंग सुवास येईल, मग भाजीतील बटाट्यांच्या कापात चमचा उभा खुपसून बटाटे शिजले आहे की नाही याची खात्री करून बघा. जर बटाटा सहजतेने कापला गेला तर भाजी व्यवस्थित शिजली आहे अशी खात्री करून घेता येईल. बटाटे व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करा आणि मग भाजीवर बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घाला.
७) अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बटाट्यांच्या कापांची गरमागरम, मसालेदार आणि चटकदार अशी स्वादिष्ट भाजी भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी तयार होईल.

चव :

खमंग, मसालेदार आणि चटपटीत