मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

गोडाचा शिरा (गोडाचा शिरा, शिरा रेसिपी मराठी, शिरा meaning in english, शिरा खाण्याचे फायदे, शिरा recipe, शिरा कसा बनवतात, शिरा कसा करावा , रव्याचा शिरा, साधा शिरा, प्रसादाचा शिरा)

गोडाचा शिरा

गोडाचा शिरा (गोडाचा शिरा, शिरा रेसिपी मराठी, शिरा meaning in english, शिरा खाण्याचे फायदे, शिरा recipe, शिरा कसा बनवतात, शिरा कसा करावा , रव्याचा शिरा, साधा शिरा, प्रसादाचा शिरा)
गोडाचा शिरा

Links To Read Blog On Godacha Sheera In Other Languages :

Blog On Godacha Sheera In English

पदार्थाविषयी माहिती :

गोडाचा शिरा हा पदार्थ चवीला गोड आणि स्वादिष्ट असतो. गोडाचा शिरा हा पदार्थ फक्त कोकण विभागात नाही तर अवघ्या जगात प्रसिद्ध असा पदार्थ आहे. गोडाचा शिरा हा जर साजूक तूपातील असेल तर त्या शिऱ्याचा आस्वाद घेण्याची मज्जा काही औरच आहे. गोडाचा शिरा हा पदार्थ केवळ सण, समारंभ, सत्यनारायण देवाची पूजा याच निमित्ताने बनवला जाणारा पदार्थ आहे, असे नाही तर गोडाचा शिरा हा चवीला गोड असल्यामुळे आनंदाच्या प्रसंगी तोंड गोड करण्यासाठी देखील विशेष बनवला जातो. शिऱ्याचा गोडवा हाच पदार्थाची चव द्विगुणित करतो. त्यामुळे गोडाचा शिरा हा पदार्थ योग्य प्रमाणात गोडासाठी साखर आणि शिजवण्यासाठी दूध, पाणी वापरून बनवला गेला, तर शिरा आणखी उत्तम बनतो. तिखट पदार्थांवर पाण्याऐवजी गोडाचा शिरा हा उत्तम उपाय देखील ठरू शकतो. बहुतेक लोकांना गोड पदार्थांमध्ये गोडाचा शिरा हा फार आवडीचा पदार्थ आहे, म्हणून आपल्या गोड माणसांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान आणण्यासाठी गोडाचा शिरा हा पदार्थ एक उत्तम बेत ठरू शकतो.

विशेषता :

गोडाचा शिरा या पदार्थाची विशेषता म्हणजे या पदार्थाचा गोडवा. शिऱ्याचा आस्वाद घेताना शिऱ्याच्या प्रत्येक घासात साखरेच्या गोडव्याची चव आणि तूपाचा खमंग स्वाद जाणवतो. कोकण विभागात गणेशोस्तवाच्या सणात उंदिरक्याच्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पाचे वाहन उंदीर मामा यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवला जातो, तो नैवेद्य म्हणजे शेवयांची खीर, परंतु काही वेळेस कोकणात घराघरात खीर ऐवजी गोडाचा शिरा हा गोड पदार्थ देखील मोठ्या आवडीने बनवला जातो. म्हणून कोकण प्रांतात गोडाचा शिरा हा पदार्थ विशेष प्रसिद्ध आहे. 

साहित्य :

१) तूप
२) दोन वाटी रवा
३) वेलची पूड
४) एक वाटी साखर
५) दहा ते वीस काजू, बदाम यांचे बारीक काप
७) एक वाटी पाणी
८) अर्धा वाटी गरम दूध

कृती :

१) गोडाचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅस चालू करून त्यावर एक खोलगट भांडे ठेवा. गॅस मंद आचेवर करून खोलगट भांड्यामध्ये दोन वाटी रवा घालून तो लालसर होईपर्यंत भाजून घ्या. रवा व्यवस्थित भाजून घेतल्यावर एका पसरट ताटात सगळा रवा काढून घ्या.
२) मग गॅस मध्यम आचेवर करून त्यात अर्धा वाटी तूप घाला, भांडे गरम झाल्यावर तूप वितळेल आणि तुपाचा सुगंध दरवळेल.
३) नंतर या गरम तूपात दहा ते वीस काजू, बदाम यांचे बारीक काप घाला आणि हे काजू, बदाम यांचे बारीक काप तूपात लालसर होईपर्यंत तळून घ्या. काजू, बदाम यांचे बारीक काप तूपात व्यवस्थित तळून घेतल्यावर ते सर्व एका छोट्या वाटीमध्ये काढून घ्या. 
३) पुढे या भांड्यामधील तूपात अगोदर भाजून घेतलेला पसरट ताटातील दोन वाटी रवा घाला, तो तुपात व्यवस्थित परतून घ्या जेणेकरून रव्यात सर्वत्र तूप एकजीव होईल. नंतर त्यात एक वाटी साखर, अर्धा चमचा वेलची पावडर घाला. हे सर्व जिन्नस व्यवस्थित ढवळून घ्या, मग हा रवा शिजण्यासाठी त्यात अर्धा वाटी गरम दूध आणि नंतर एक वाटी पाणी घाला. हे सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. 
४) भांड्यातील रवा चमचाच्या साहाय्याने सतत ढवळत राहा, असे केल्याने भांड्यातील रवा हळू हळू पाणी आणि दूध शोषून घेईल आणि मध्यम आचेवर रवा व्यवस्थित शिजेल. अशा पद्धतीने रवा सतत हलवत राहा, म्हणजे तो भांड्याला चिकटणार नाही. रव्यातील पाणी आणि दूध निघून गेल्यावर रवा व्यवस्थित शिजला आहे, याची खात्री करून घेता येईल. अशा पद्धतीने गोडाचा शिरा व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करा. गोडाचा शिरा उत्कृष्ट दिसण्याकरिता तो सजवण्यासाठी आणि शिऱ्याची स्वादिष्टता आणि चव अधिक वाढवण्यासाठी त्यावर तूपात खरपूस भाजून घेतलेले आणि छोट्या वाटीत काढून घेतलेले दहा ते वीस काजू, बदाम यांचे बारीक काप यांचा आवडीनुसार वापर करता येईल.
५) दहा ते पंधरा मिनिट मध्ये गरमागरम, खमंग आणि गोड असा स्वादिष्ट तूपातील गोडाचा शिरा खाण्यासाठी तयार होईल.

चव :

स्वादिष्ट, खमंग आणि गोड