मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

तळलेली इडली (इडली, इडली रेसिपी, इडली recipe in marathi, इडली in marathi, तांदळाची इडली, इडली चटणी)

तळलेली इडली

तळलेली इडली (इडली, इडली रेसिपी, इडली recipe in marathi, इडली in marathi, तांदळाची इडली, इडली चटणी)
तळलेली इडली

Links To Read Blog On Talaleli Idali In Other Languages :

Blog On Talaleli Idali In English

पदार्थाविषयी माहिती :

तळलेली इडली हा पदार्थ चवीला अतिशय कुरकुरीत, चवदार आणि सर्वांना आवडेल असा आगळावेगळा पदार्थ आहे. तळलेली इडली हा पदार्थ फार कमी वेळात होणारा झटपट पदार्थ आहे. याशिवाय बहुतेक लोकांना इडली चटणी खायला फार आवडते आणि तळलेली इडली हा पदार्थ इडलीपासून बनवला जातो, त्यामुळे हा पदार्थ बऱ्याच लोकांचा आवडीचा पदार्थ होऊ शकतो. रात्रीच्या उरलेल्या इडल्यांपासून आपण घरी असलेले साहित्य वापरून बरेच स्वादिष्ट पदार्थ बनवू शकतो, जसे की तळलेली इडली, मसाला इडली, इडलीच्या फोडणीचा भात इत्यादी चटपटीत, खमंग आणि रुचकर असे पौष्टिक पदार्थ आपण इडलीपासून बनवू शकतो. कोकण विभागात इडली, डोसा, आंबोळ्या, घावणे इत्यादी असे बरेच पौष्टिक पदार्थ बनवले जातात, परंतु काही वेळेस जर इडल्या अधिक उरल्या तर त्या दुसऱ्या दिवशी वाया जाऊ नये म्हणून कोकणात तळलेली इडली हा पदार्थ विशेष बनवला जातो.

विशेषता :

तळलेली इडली या पदार्थाची मुख्य विशेषता अशी की हा पदार्थ झटपट होणारा पदार्थ आहे. शिवाय हा पदार्थ चवीला अतिशय सुरेख आणि चवदार लागतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की इडली हा हलक्या स्वरूपाचा आहार असून फार पौष्टिक असतो, त्यामुळे सर्वांनी आपल्या आहारात इडली चटणीचा आवर्जून समावेश केला पाहिजे. तळलेली इडली या पदार्थाची अन्य विशेषता अशी आहे की जर घरी अगोदरच्या दिवशी बनवलेल्या इडल्या उरल्या असतील तर त्या दुसऱ्या दिवशी टाकून देऊ नका. 'अन्न हे पूर्णब्रह्म' हे आपल्या सर्वांना ज्ञात असेलच, त्यामुळे अन्नाचे मोल लक्षात घेऊन रात्रीचे उरलेले अन्न वाया जाऊ न देण्यासाठी आपण त्यापासून नवीन असे पौष्टिक पदार्थ बनवू शकतो. आपण या रात्रीच्या उरलेल्या इडल्यांपासून घरच्या घरी उपलब्ध असलेले कमी साहित्य वापरून फार कमी वेळात तळलेली इडली हा पदार्थ बनवू शकतो. तळलेली कुरकुरीत आणि चविष्ट इडली हा पदार्थ टॉमॅटो सॉस किंवा खोबऱ्याची तिखट चटणी यांसोबत खाण्यासाठी नाश्त्याचा उत्तम बेत ठरू शकतो.

साहित्य :

१) तेल
२) काल रात्रीच्या इडल्या

कृती :

१) तळलेली इडली बनवण्यासाठी फार साहित्याची आवश्यकता भासत नाही. अगोदरच्या दिवशी इडल्या बनवल्या असतील आणि जर रात्रीच्या जास्त इडल्या उरल्या तर त्या वाया जाऊ नयेत म्हणून दुसऱ्या दिवशी या इडल्या तळून खाता येतील. 
२) तळलेली इडली हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या ताटामध्ये रात्रीच्या उरलेल्या इडल्या घ्या. या सर्व इडल्यांचे सूरीच्या साहाय्याने समान आकाराचे तीन भाग करून घ्या.
३) यानंतर गॅस चालू करून त्यावर एक मोठी कढई ठेवा आणि या कढईत इडल्या तळून घेण्यासाठी आवश्कतेनुसार तेल घाला.
४) गॅस मध्यम आचेवर करून कढईमधील तेल गरम होण्यासाठी ठेवून द्या. एकदा का तेल गरम झाले की इडल्या सहजपणे तळून घेता येतील.
५) तेल व्यवस्थित गरम झाल्यावर गॅस मंद आचेवर करून घ्या आणि मग अतिशय काळजीपूर्वक पद्धतीने तीन भाग करून घेतलेल्या इडल्या या गरम तेलात सोडा. इडल्या तेलात सोडताना अंगावर तेल उडणार नाही याची विशेष काळजी घ्या. नंतर गॅस मध्यम आचेवर करून या सर्व इडल्या लालसर तांबूस रंगाच्या होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्या.
६) इडल्या चांगल्या तळून घेतल्यावर झाऱ्याच्या साहाय्याने या इडल्यांमधील तेल गाळून एका ताटात काढून घ्या. अशा प्रकारे गरमागरम, कुरकुरीत आणि चविष्ट अशा तळलेल्या पौष्टिक इडल्या टोमॅटोचा सॉस किंवा खोबऱ्याची तिखट चटणी यांसोबत खाण्यासाठी तयार होतील.

चव :

चविष्ट, कुरकुरीत आणि पौष्टिक