मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

फ्लॉवर बटाट्याची मसालेदार भाजी (फ्लावर भाजी रेसिपी, फ्लावर भाजी ची रेसिपी, फ्लावर भाजी रेसिपी मराठी, फ्लावर भाजी कशी करायची, फ्लावर ची सुकी भाजी, फुल गोबी ची भाजी, फ्लावर बटाटा भाजी रेसिपी, फ्लावर बटाटा भाजी, फ्लावर बटाटा सुकी भाजी, फ्लावर बटाटा रेसिपी)

फ्लॉवर बटाट्याची मसालेदार भाजी

फ्लॉवर बटाट्याची मसालेदार भाजी (फ्लावर भाजी रेसिपी, फ्लावर भाजी ची रेसिपी, फ्लावर भाजी रेसिपी मराठी, फ्लावर भाजी कशी करायची, फ्लावर ची सुकी भाजी, फुल गोबी ची भाजी, फ्लावर बटाटा भाजी रेसिपी, फ्लावर बटाटा भाजी, फ्लावर बटाटा सुकी भाजी, फ्लावर बटाटा रेसिपी)
फ्लॉवर बटाट्याची मसालेदार भाजी

Links To Read Blog On Flower Batatyachi Masaledar Bhaji In Other Languages :

Blog On Flower Batatyachi Masaledar Bhaji In English

पदार्थाविषयी माहिती :

फ्लॉवर बटाट्याची मसालेदार भाजी हा पदार्थ कोकण विभागात गरमागरम भाकरी किंवा चपाती यासोबत खाण्यासाठी फार आवडीने बनवला जातो. याशिवाय फ्लॉवरची भाजी ही कोकणात निरनिराळ्या प्रकारे बनवली जाते, आपल्या आवडीनुसार काही जण फ्लॉवरच्या भाजीत बटाटा घालतात, तर काही जणांना फ्लॉवरच्या भाजीत ओला मटार घातलेला आवडतो. त्यामुळे बहुतेक जण आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने फ्लॉवरची भाजी बनवतात, भाजीत वापरले जाणारे मसाले भाजीची लज्जत आणखी वाढवतात. फ्लॉवरची भाजी ही फार पौष्टिक मानली जाते कारण या भाजीचे बरेच फायदे आहेत. फ्लॉवरच्या भाजीत आरोग्यासाठी आवश्यक असणारी पोषक तत्वे असून ही भाजी अनेक खनिजांनी समृध्द आहे. फ्लॉवरच्या भाजीत असणारे सी जीवनसत्व कोलेजन या प्रथिनाचे उत्पादन करण्यासाठी मदत करते आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. तसेच भाजीत असणारे के जीवनसत्व हे शरीरातील हाडांसाठी आणि रक्त वाढवण्यासाठी साहाय्य करते. फ्लॉवरची भाजी खाण्याचा एक अन्य महत्वाचा फायदा असा आहे की ही भाजी कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रणात ठेवते आणि भाजीत असणारे फायटोन्यूट्रिएंट्स कर्करोगाच्या वाढत जाणाऱ्या पेशी कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. फ्लॉवरच्या भाजीचे कित्येक फायदे असून ही भाजी चवीला फार उत्तम लागते, म्हणून बहुतेक लोक फ्लॉवरची भाजी आणि त्यापासून बनवले जाणारे पदार्थ मोठ्या आवडीने खातात.

विशेषता :

फ्लॉवर बटाट्याची मसालेदार भाजी या पदार्थाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे या भाजीची मसालेदार चव होय. भाजीत वापरला जाणारा मसाला आणि गरम मसाला हा फ्लॉवरच्या भाजीची स्वादिष्टता आणि तिखटपणा वाढवतो. भाजीत बटाटा वापरल्यामुळे भाजी अधिक रुचकर बनून भाजीची चव अधिक वाढते. ज्यांना फ्लॉवरची भाजी खाण्यासाठी आवडत नाही त्यांच्यासाठी भाजीत बटाटा घालून भाजी बनवता येऊ शकते, कारण बटाटा भाजी ही सर्वांचीच फार आवडती भाजी असते, त्यामुळे जर भाजीत बटाटा घातला तर भाजी नक्कीच आवडीने खाल्ली जाईल. फ्लॉवर बटाट्याच्या मसालेदार भाजीचा आस्वाद हा तांदळाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या भाकरीसोबत किंवा गव्हाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या चपातीसोबत घेता येऊ शकतो.

साहित्य :

१) तेल
२) मोहरी
३) सात ते आठ कढीपत्त्याची पाने
४) जिरे
५) चार ते पाच बारीक कापून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या
६) बारीक कापून घेतलेला आल्याचा अर्धा तुकडा
७) एक बारीक चिरलेला कांदा
८) दोन बारीक चिरलेले टोमॅटो
९) दोन बटाटी
१०) हळद
११) मसाला
१२) गरम मसाला
१३) मीठ
१४) एक मोठा फ्लॉवर
१५) कोथिंबीर

कृती :

१) फ्लॉवर बटाट्याची मसालेदार भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा एक मोठा फ्लॉवर आणि दोन बटाटी स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून फ्लॉवर च्या भाजीवर आणि बटाट्यांच्या सालीला असणारी माती निघून जाईल. नंतर या फ्लॉवर च्या भाजीची पाने काढून टाका, फ्लॉवरच्या भाजीत कीड आहे की नाही हे व्यवस्थित बघून एका मोठ्या ताटामध्ये फ्लॉवरची भाजीचे तुकडे काढून घ्या, आणि मग ही भाजी विळीवर किंवा सुरीच्या मदतीने बारीक चिरून घ्या. नंतर सोलण्याच्या साहाय्याने दोन बटाट्यांची साल काढून बटाट्यांचे चार भाग करून नंतर त्यांचे बारीक काप करून घ्या. एका टोपात पाणी घेऊन त्यात बारीक चिरून घेतलेली फ्लॉवरची भाजी आणि ही बारीक कापलेली बटाटी भिजत ठेवा, असे केल्याने फ्लॉवरची भाजी हवेत नरम होणार नाही आणि पाण्यात भाजी चांगली ताजी राहील आणि बटाट्यांच्या कापांचा रंग लालसर होणार नाही, शिवाय बटाट्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जाईल.
२) फ्लॉवरची भाजी चिरून घेतल्यावर आणि बटाट्यांचे बारीक काप करून घेतल्यावर फ्लॉवरची बटाट्याची भाजी बनवण्याचे काम अगदी सोपे होऊन जाते.
३) त्यानंतर भाजी बनवण्यासाठी गॅस चालू करून त्यावर एक मोठी कढई ठेवा, कढई चांगली तापल्यानंतर त्यात दहा ते बारा चमचे तेल घाला, मग गॅस मंद आचेवर करून त्यात अर्धा चमचा मोहरी घाला, मोहरी तेलात व्यवस्थित तडतडल्यावर फोडणीत मोहरीचा खूप छान सुगंध दरवळेल, मग त्यात सात ते आठ कढीपत्त्याची पाने घाला. फोडणीत मोहरी, कढीपत्ता व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात लगेचच चार ते पाच बारीक कापून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या आणि बारीक कापून घेतलेला आल्याचा अर्धा तुकडा घाला.
४) तेलात ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घेतल्यावर फोडणीत लसणीच्या पाकळ्यांचा आणि आल्याचा हलकासा सुगंध येईल. त्यानंतर या फोडणीत एक बारीक चिरलेला कांदा घाला.
५) कढईतील ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घ्या, तेलात कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या. कांदा लालसर होईस्तोवर दुसऱ्या बाजूला टोपातील पाण्यात भिजत ठेवलेली फ्लॉवरची भाजी आणि बटाट्यांचे बारीक काप यामधील पाणी काढून टाका.
६) कांदा तेलात लालसर झाल्यानंतर त्यात चिमूटभर हळद, दोन चमचे मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घाला. (नोंद : ज्यांना कमी तिखट पदार्थ खायला आवडतात, त्यांच्यासाठी आवडीनुसार कमी तिखटासाठी भाजीतील फोडणीत दोन चमचे यांपेक्षा कमी मसाला आणि अर्धा चमचापेक्षा कमी गरम मसाला घालता येऊ शकतो. ) यानंतर लगेचच भांड्यातील पाणी काढून घेतलेली बारीक चिरलेली फ्लॉवरची भाजी आणि बटाट्यांचे बारीक काप फोडणीत घाला. फ्लॉवरची भाजी आणि बटाट्याचे बारीक काप घालताना त्यात अजिबात पाणी असणार नाही याची विशेष काळजी घ्या, कारण फ्लॉवर बटाट्याची मसालेदार भाजी ही वाफेवर व्यवस्थित शिजेल, त्यामुळे फ्लॉवर बटाट्याची मसालेदार भाजी शिजवण्यासाठी त्यात अजिबात पाणी घालू नका.
७) मग त्यात चवीनुसार मीठ घालून सर्व भाजी व्यवस्थित परतून घ्या म्हणजे सर्व फोडणी, फोडणीतील हळद, मसाला, गरम मसाला आणि मीठ हे सर्वत्र भाजीला व्यवस्थित लागेल. पुढे गॅस मध्यम आचेवर करून फ्लॉवर बटाट्याची मसालेदार भाजी शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवा. मग तीन ते चार मिनिटांनी काळजीपूर्वक कढईवरील झाकण काढून बघा, भाजीला पाणी सुटले असेल याचा अर्थ फ्लॉवरची भाजी आणि बटाटी अजून शिजलेली नाहीत म्हणून फ्लॉवर बटाट्याची मसालेदार भाजी चमचाच्या साहाय्याने व्यवस्थित परतून घ्या. नंतर त्यात वरून दोन बारीक चिरलेले टोमॅटो घाला आणि भाजी वाफेवर शिजण्यासाठी पुन्हा कढईवर झाकण ठेवा.
८) यानंतर गॅस मंद आचेवर करून घ्या, कारण फ्लॉवर बटाट्याची मसालेदार भाजी वाफेवर शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही, जर गॅस मध्यम आचेवर करून भाजी शिजवली तर ती करपून जाण्याची शक्यता असते. यासाठी मंद आचेवर भाजी शिजण्यासाठी ठेवून द्या. नंतर पाच ते सहा मिनिटांंनंतर काळजीपूर्वक कढईवरील झाकण काढून बघा, भाजीतील टोमॅटो शिजून नरम झालेला दिसेल आणि भाजीत टॉमॅटो घातल्यामुळे किंचित पाणी सुटले असेल, मग ही भाजी व्यवस्थित ढवळून घ्या म्हणजे टॉमॅटो भाजीत सर्वत्र व्यवस्थित लागेल. यानंतर कढईवर झाकण ठेवून भाजी चार ते पाच मिनिटांसाठी पुन्हा वाफेवर शिजण्यासाठी ठेवून द्या. चार ते पाच मिनिटांनंतर झाकण उघडून पाहिले तर भाजीतील पाणी निघून गेले असेल आणि भाजीचा खमंग सुवास येईल, भाजीतील फ्लॉवर हे वाफेवर पटकन शिजते त्यामुळे ते नरम झालेले दिसेल, तसेच भाजीतील बटाट्यांच्या बारीक कापात चमचा उभा खुपसून बटाटे शिजले आहे की नाही याची खात्री करून बघा. जर बटाटे सहजतेने कापले गेले तर भाजी व्यवस्थित शिजली आहे अशी खात्री करून घेता येईल. फ्लॉवर आणि बटाटे व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करा आणि मग भाजीवर बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घाला.
९) अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये फ्लॉवर बटाट्याची स्वादिष्ट, मसालेदार आणि उत्कृष्ट अशी भाजी गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी तयार होईल.

चव :

तिखट, खमंग आणि मजेदार