मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

कोबी बटाट्याची भाजी (कोबी, कोबीची भाजी, कोबीची भाजी रेसिपी मराठी, कोबीची भाजी दाखवा, कोबीची भाजी कशी करतात, कोबीची भाजी कशी करावी, कोबीची भाजी बनवायची रेसिपी, कोबीची भाजी कशी बनवायची, कोबीची भाजी कशी बनवायची ते दाखवा, कोबीची भाजी कशी बनवतात ते दाखवा, कोबीची भाजी ची रेसिपी दाखवा, कोबीची भाजी बनवायची, कोबीची भाजी रेसिपी दाखवा, कोबीची भाजी कशी करायची ते दाखवा, कोबी बटाटा भाजी)

कोबी बटाट्याची भाजी

कोबी बटाट्याची भाजी (कोबी, कोबीची भाजी, कोबीची भाजी रेसिपी मराठी, कोबीची भाजी दाखवा, कोबीची भाजी कशी करतात, कोबीची भाजी कशी करावी, कोबीची भाजी बनवायची रेसिपी, कोबीची भाजी कशी बनवायची, कोबीची भाजी कशी बनवायची ते दाखवा, कोबीची भाजी कशी बनवतात ते दाखवा, कोबीची भाजी ची रेसिपी दाखवा, कोबीची भाजी बनवायची, कोबीची भाजी रेसिपी दाखवा, कोबीची भाजी कशी करायची ते दाखवा, कोबी बटाटा भाजी)
कोबी बटाट्याची भाजी

Links To Read Blog In Other Languages On Kobi Batatyachi Bhaji :

Blog On Kobi Batatyachi Bhaji In English

पदार्थाविषयी माहिती :

कोबी बटाट्याची भाजी हा पदार्थ कोकण विभागात विशेष प्रसिद्ध असून कोबी बटाट्याची भाजी ही गरमागरम चपाती किंवा भाकरी यासोबत खाण्यासाठी बनवली जाते. कोबीच्या भाजीचे अनेक फायदे आहेत, म्हणून कोबीची भाजी हा निरोगी आहाराचा एक प्रमुख स्रोत मानला जातो. कोबीच्या भाजीत पथ्यासंबंधित तंतुमय पदार्थ असतात, तसेच कॅल्शियम, व्हिटॅमिन बी ६ आणि प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत करणारे व्हिटॅमिन सी यांचा चांगला समावेश असतो. कोबीच्या भाजीत कॅलरीचे प्रमाण फार कमी असून या भाजीत मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि मँगनीज ही खनिजे देखील असतात. असंख्य फायदे असणारी कोबीची भाजी खाल्ल्याने पचनक्रिया आणि हृदयाचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होण्यास मदत होते, शिवाय मोतीबिंदू रोखण्यास मदत होते आणि मेंदूची शक्ती वाढते. कोबीची भाजी ही वेगवेगळ्या प्रांतात निरनिराळ्या पद्धतीने बनवली जाते. काही ठिकाणी कोबीची भाजी बनवताना भाजीचा स्वाद वाढवण्यासाठी त्यात विविध मसाले वापरले जातात, तर काही ठिकाणी कोबीची भाजी बनवताना त्यात चण्याची डाळ वापरली जाते, तर काही ठिकाणी भाजीत बटाटा देखील वापरला जातो. कोकण विभागात देखील बऱ्याच पद्धतीने कोबीची भाजी बनवली जाते, त्यातील एक पद्धत म्हणजे कोबीच्या भाजीत बटाटा भाजीचा वापर आणि मसाल्याऐवजी हिरव्या मिरचीचा वापर होय.         

विशेषता :

कोबी बटाट्याची भाजी या पदार्थाची मुख्य विशेषता अशी आहे की ही भाजी प्रामुख्याने कोकण विभागात खानावळ असलेल्या ठिकाणी गहूच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या चपाती सोबत खाण्यासाठी बनवली जाते. कोबी बटाट्याची भाजी ही बनवायला अतिशय सोपी असून पटकन होणारी भाजी असल्यामुळे कोकणात खानावळीच्या ठिकाणी, उपहारगृहामध्ये देखील कुर्मा भाजी, बटाट्याची भाजी या भाज्यांबरोबरच थाळीत कोबी बटाट्याच्या भाजीचा समावेश हा प्रामुख्याने केला जातो.     

साहित्य :

१) तेल
२) मोहरी
३) जिरे
४) सात ते आठ कढीपत्त्याची पाने
५) बारीक कापून घेतलेला आल्याचा अर्धा तुकडा
६) तीन ते चार भाग करून घेतलेल्या चार हिरव्या मिरच्या
७) एक बारीक चिरलेला कांदा
८) हळद
९) मीठ
१०) एक मोठा कोबी
११) दोन बटाटी
१२) कोथिंबीर

कृती :

१) कोबी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम भाजी बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य जवळ तयार ठेवा. पहिल्यांदा एक मोठा कोबी आणि दोन बटाटी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून कोबीच्या भाजीला असणारी आणि बटाट्यांच्या सालीला असणारी माती निघून जाईल. नंतर हा मोठा कोबी एका ताटामध्ये विळीवर किंवा सुरीच्या मदतीने बारीक चिरून घ्या. नंतर सोलण्याच्या साहाय्याने दोन बटाट्यांची साल काढून बटाट्यांचे चार भाग करून नंतर त्यांचे बारीक काप करून घ्या. एका टोपात पाणी घेऊन त्यात एक बारीक चिरून घेतलेली कोबीची भाजी आणि ही बारीक कापलेली बटाटी भिजत ठेवा, असे केल्याने कोबीची भाजी हवेत आळणार नाही आणि पाण्यात भाजी चांगली ताजी राहील आणि बटाट्यांच्या कापांचा रंग लालसर होणार नाही, शिवाय बटाट्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जाईल.
२) कोबी चिरून घेतल्यावर आणि बटाट्यांचे बारीक काप करून घेतल्यावर कोबी बटाट्याची भाजी बनवण्याचे काम अगदी सोपे होऊन जाते.
३) त्यानंतर भाजी बनवण्यासाठी गॅस चालू करून त्यावर एक मोठी कढई ठेवा, कढई चांगली तापल्यानंतर त्यात सहा ते सात चमचे तेल घाला, मग गॅस मंद आचेवर करून त्यात अर्धा चमचा मोहरी घाला, मोहरी तेलात व्यवस्थित तडतडल्यावर फोडणीत मोहरीचा खूप छान सुगंध दरवळेल, मग त्यात अर्धा चमचा जिरे आणि सात ते आठ कढीपत्त्याची पाने घाला. फोडणीत मोहरी, जिरे आणि कढीपत्ता व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात लगेचच बारीक कापून घेतलेला आल्याचा अर्धा तुकडा आणि तीन ते चार भाग करून घेतलेल्या चार हिरव्या मिरच्या घाला.
४) तेलात ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घेतल्यावर फोडणीत आल्याचा हलकासा सुगंध येईल आणि त्यातील मिरच्या भाजल्यानंतर फोडणीतून मिरच्यांचा तिखट स्वाद येईल. त्यानंतर या फोडणीत एक बारीक चिरलेला कांदा घाला.
५) कढईतील ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घ्या, तेलात कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या. कांदा लालसर होईस्तोवर दुसऱ्या बाजूला टोपातील पाण्यात भिजत ठेवलेली कोबीची भाजी आणि बटाट्यांचे बारीक काप यामधील पाणी काढून टाका.
६) कांदा तेलात लालसर झाल्यानंतर त्यात चिमूटभर हळद घाला. यानंतर लगेचच भांड्यातील पाणी काढून घेतलेली बारीक चिरलेली कोबीची भाजी आणि बटाट्याचे बारीक काप फोडणीत घाला. कोबीची भाजी आणि बटाट्याचे बारीक काप घालताना त्यात अजिबात पाणी असणार नाही याची विशेष काळजी घ्या, कारण कोबी बटाट्याची भाजी ही वाफेवर व्यवस्थित शिजेल, त्यामुळे कोबी बटाट्याची भाजी शिजवण्यासाठी त्यात अजिबात पाणी घालू नका.
७) मग त्यात चवीनुसार मीठ घालून सर्व भाजी व्यवस्थित परतून घ्या म्हणजे सर्व फोडणी, फोडणीतील मिरचीचा तिखट स्वाद, हळद आणि मीठ हे सर्वत्र भाजीला व्यवस्थित लागेल. पुढे गॅस मध्यम आचेवर करून कोबी बटाट्याची भाजी शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवा. मग तीन ते चार मिनिटांनी काळजीपूर्वक कढईवरील झाकण काढून बघा, भाजीला पाणी सुटले असेल याचा अर्थ कोबीची भाजी आणि बटाटी अजून शिजलेली नाही म्हणून कोबी बटाट्याची भाजी चमचाच्या साहाय्याने व्यवस्थित परतून घ्या. नंतर भाजी वाफेवर शिजण्यासाठी पुन्हा कढईवर झाकण ठेवा.
८) यानंतर गॅस मंद आचेवर करून घ्या, कारण कोबी बटाट्याची भाजी वाफेवर शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही, जर गॅस मध्यम आचेवर करून भाजी शिजवली तर ती करपून जाण्याची शक्यता असते. यासाठी मंद आचेवर भाजी शिजण्यासाठी ठेवून द्या. नंतर पाच ते दहा मिनिटांंनंतर काळजीपूर्वक कढईवरील झाकण काढून बघा, भाजीतील पाणी निघून गेले असेल आणि भाजीचा खमंग सुवास येईल, भाजीतील कोबी हे वाफेवर पटकन शिजते त्यामुळे ते नरम झालेले दिसेल, तसेच भाजीतील बटाट्यांच्या बारीक कापात चमचा उभा खुपसून बटाटे शिजले आहे की नाही याची खात्री करून बघा. जर बटाटे सहजतेने कापले गेले तर भाजी व्यवस्थित शिजली आहे अशी खात्री करून घेता येईल. कोबी आणि बटाटे व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करा आणि मग भाजीवर बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घाला.
९) अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये कोबी बटाट्याची गरमागरम, हळदीमुळे किंचित पिवळसर आणि स्वादिष्ट अशी चवदार भाजी भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी तयार होईल.

चव :

स्वादिष्ट आणि रुचकर