मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

कुळीथाची पिठी (कुळथाची पिठी, कुळीथ, कुळीथ पीठ, कुळीथ पीठ रेसिपी, कुळीथ खाण्याचे फायदे, कुळीथ फायदे मराठी, हुलगे खाण्याचे फायदे)

कुळीथाची पिठी

कुळीथाची पिठी (कुळथाची पिठी, कुळीथ, कुळीथ पीठ, कुळीथ पीठ रेसिपी, कुळीथ खाण्याचे फायदे, कुळीथ फायदे मराठी, हुलगे खाण्याचे फायदे)
कुळीथाची पिठी

Links To Read Blog In Other Languages On Kulithachi Pithi :

Blog On Kulithachi Pithi In English

पदार्थाविषयी माहिती :

कुळीथाची पिठी हा पदार्थ कोकणात विशेष प्रसिद्ध आहे. कुळीथाची पिठी हा पदार्थ बहुत करून ग्रामीण भागांत, खेडेगावांत घराघरांमध्ये मऊ भातासोबत वरणाऐवजी खाण्यासाठी बनवला जातो. हा पदार्थ शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे. भातासोबत कुळीथाची पिठी आणि लोणचे हा आपल्या रोजच्या जेवणाचा बेत म्हणून देखील आपण स्वयंपाकात बनवू शकतो. कुळीथाची पिठी हा लवकर होणारा पदार्थ असल्यामुळे वरण बनवण्याचा वेळ देखील वाचतो आणि गरमागरम मऊ लुसलुशीत भातासोबत कुळीथाच्या पिठीचा आस्वाद घेता येऊ शकतो.

विशेषता :

जेव्हा गृहीणींना स्वयंपाक बनवताना भातासोबत वरण बनवण्याचा कंटाळा येतो तेव्हा कुळीथाची पिठी हा अत्यंत त्वरित आणि झटपण होणारा चविष्ट आणि पौष्टिक असा पदार्थ आहे. गरमागरम चवदार अशी कुळीथाची पिठी मऊमऊ भातासोबत खूपच छान लागते.

साहित्य :

१) तेल
२) अर्धा बारीक चिरलेला कांदा
३) हळद 
४) मसाला 
५) मीठ
६) पाणी 
७) कुळीथ धान्याचे बारीक दळलेले दोन वाटी पीठ

कृती :

१) प्रथम एक मोठे भांडे (टोप) घ्या.

२) टोपात एक ते दोन चमचे तेल घाला. तेल थोडे गरम झाल्यावर मंद आचेवर त्यात अर्धा बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा तेलात लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
३) कांदा तेलात व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्यात चिमूटभर हळद, तिखटानुसार अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा जास्त चमचा मसाला घाला. हळद, मसाला हे लालसर झालेल्या कांद्यात व्यवस्थित एकजीव होण्यासाठी फोडणी चांगली परतून घ्या. 

४) फोडणी भाजल्यानंतर त्यात अर्धा ग्लास पाणी घाला.
५) नंतर त्यात कुळीथ धान्याचे बारीक दळलेले दोन वाटी पीठ घाला, हे पीठ टोपातल्या पाण्यात व्यवस्थित एकजीव होण्यासाठी चमच्याने ढवळत राहा. पीठ ढवळताना त्यात पिठाचे गठ्ठे राहणार नाही याची विशेष काळजी घ्या. पिठीचे मिश्रण जास्तच घट्ट दिसल्याचे वाटून त्यात अंदाजाने थोडे थोडे पाणी घालून ते व्यवस्थित ढवळून घ्या.
६) पिठी व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला. मंद केलेली आच किंचित वाढवून घ्या, त्यानंतर पिठीला उकळी येण्यास सुरुवात होईल. 
७) कुळीथाची पिठी जास्त आचेवर ठेवल्याने ओतू जाऊ शकते, ती ओतू जाऊ नये आणि व्यवस्थित उकळावी यासाठी त्यात चमचा उलटा करून ठेवा. कुळीथाची पिठी व्यवस्थित उकळली की काळजीपूर्वक पिठीतील चमचा रुमालाच्या साहाय्याने बाहेर काढा आणि गॅस बंद करा.
८) पाच ते सात मिनिटांच्या उकळीनंतर पिठीतले पीठ व्यवस्थित शिजून जास्त पातळ पण नसलेली आणि फार घट्ट पण नसलेली मध्यम प्रतीची खमंग, चवदार आणि गरमागरम अशी कुळीथाची पिठी भातासोबत खाण्यास तयार होईल.

चव : 

चवदार तिखट