मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

कोळंबी मसाला (कोळंबी, कोळंबी खाण्याचे फायदे, कोळंबी रस्सा, कोळंबी रेसिपी, कोळंबीचा रस्सा, कोळंबी म्हणजे काय, कोळंबीची रेसिपी, कोळंबी कशी बनवतात, कोळंबी मासा, कोळंबी फ्राय, कोळंबी फिश, कोळंबी बिर्याणी, कोळंबी मसाला, कोळंबी मसाला रेसिपी मराठी, कोळंबी मसाला फ्राय, कोळंबी मसाला फोटो, कोळंबी भात मसाले, मालवणी कोळंबी मसाला रेसिपी मराठी)

कोळंबी मसाला 

कोळंबी मसाला

Links To Read Blog On Kolambi Masala In Other Languages :

Blog On Kolambi Masala In English

पदार्थाविषयी माहिती :

मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या कोकण वासियांचा मासे हा जणू प्राण आहे. म्हणूनच कोकण प्रांतात राहणारे बहुतेक लोक हे मांसाहारी आहेत. कोळंबी मसाला हा पदार्थ कोकणाची शान आहे आणि आज बघायला गेले तर या पदार्थाची चव ही फक्त कोकणापर्यंत मर्यादित राहिलेली नाही तर हा पदार्थ संपूर्ण महाराष्ट्रात फार प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात वेगवगेळ्या ठिकाणी कोळंबी मसाला हा पदार्थ बनवण्याची पद्धत निरनिराळी असून त्याची चवी देखील निराळ्या आहेत. कोळंबी मसाला हा पदार्थ नावाप्रमाणे मसालेदार असून कोकणात ज्या खास पद्धतीने बनवला जातो, त्यामुळे या पदार्थाची लज्जत आणखी वाढते.     

पदार्थाची विशेषता :

कोकणात कोळंबी मसाला हा पदार्थ बनवताना प्रामुख्याने कोकमाचा वापर केला जातो, त्यामुळे मच्छीचा येणार वास आणि हिवस चव निघून जाते. कोळंबी मसाला बनवताना त्यात वापरला जाणारा मालवणी मसाला पदार्थ आणखी रुचकर आणि चविष्ट बनवतो, ही या पदार्थाची मुख्य विशेषता आहे.   

साहित्य :

१) तेल 
२) सात ते आठ कढीपत्त्याची पाने 
३) मीठ
४) हळद 
५) मसाला (मालवणी मसाला किंवा चिकन मसाला) 
६) अर्धा वाटी आलं लसूण पेस्ट
७) एका लिंबाचा रस 
८) चार बारीक चिरलेले कांदे 
९) चार बारीक चिरलेले टोमॅटो 
१०) सहा ते सात कोकम 
११) एक वाटी कोळंबी मच्छी
१२) कोथिंबीर     

कृती :

१) कोळंबी मसाला हा कोकण विशेष पदार्थ बनवण्यासाठी सर्वात पहिला एक वाटी कोळंबीची मच्छी व्यवस्थित सोलून घ्यावी आणि कोळंबीच्या मच्छीवरील कडक आवरण आणि मच्छीत असणारा काळ्या रंगाचा धागा काळजीपूर्वक पद्धतीने मच्छीपासून वेगळा करावा. अशा पद्धतीने साफ करून घेतलेली सगळी कोळंबी पाण्याने तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून एका वाटीत काढून घ्या.
२) कोळंबी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यात एका लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, दोन चमचे आलं लसूण पेस्ट घाला आणि हे सर्व जिन्नस कोळंबीच्या मच्छीत एकजीव करून १५ ते २० मिनिटांसाठी असेच ठेवून द्या, असे केल्याने कोळंबीच्या मच्छीचा हिवसपणा निघून जातो.
३) १५ ते २० मिनिटे झाल्यानंतर गॅस चालू करून त्यावर एक कढई ठेवा. गॅस मध्यम आचेवर करून त्यात ४ ते ५ चमचे तेल घाला. तेल गरम झाले की गॅस मंद आचेवर करून फोडणीत सात ते आठ कढीपत्त्याची पाने, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घाला. कढीपत्त्याची पाने आणि आलं लसूण पेस्ट तेलात चांगली परतून घेतल्यावर फोडणीचा खूप छान सुगंध येईल. मग त्यात चार बारीक चिरलेले कांदे घाला आणि गॅस पुन्हा मध्यम आचेवर करून कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्या. कांदा तेलात लालसर झाल्यानंतर त्यात चार बारीक चिरलेले टोमॅटो घाला. ही सर्व भाजी व्यवस्थित ढवळून घ्या आणि मग कढईवर ५ मिनिटे झाकण ठेवून टोमॅटो वाफेवर शिजण्यासाठी ठेवून द्या.
४) ५ मिनिटे झाल्यानंतर काळजीपूर्वक कढईवरील झाकण उघडून बघा, भाजीतील टोमॅटो नरम झालेला दिसेल, याचा अर्थ भाजीतील टोमॅटो शिजलेला आहे, मग त्यात अंदाजे चवीनुसार थोडे मीठ (आपण अगोदरच कोळंबीच्या मच्छीला चवीनुसार मीठ लावून घेतले होते, त्यामुळे कांदा आणि टोमॅटो यांना चव येण्यासाठी यात अंदाजे थोडे मीठ घाला. ), अर्धा चमचा हळद, दोन चमचे मसाला (तिखट म्हणून रोजच्या वापरातील मसाल्याऐवजी आवश्यकतेनुसार घरी उपलब्ध असल्यास मालवणी मसाला किंवा चिकन मसाला वापरता येऊ शकतो. ) घाला. नंतर हे सर्व जिन्नस चमच्याने व्यवस्थित परतून घ्या. 
५) नंतर यात लिंबाचा रस आणि आलं लसूण पेस्ट लावून घेतलेली कोळंबीची मच्छी घाला आणि त्याबरोबरच यात सहा ते सात कोकम घाला कारण कोकमामुळे मच्छीचा येणारा वास निघून जाऊन कोळंबीच्या मच्छीची चव अधिक उत्कृष्ट लागते. मग ही सर्व मच्छी चांगल्या प्रकारे परतून घ्या जेणेकरून हे सर्व जिन्नस आणि मसाला कोळंबीच्या मच्छीला व्यवस्थित लागेल. कोळंबीच्या मच्छीविषयी अतिशय महत्वाची बाब म्हणजे या मच्छीला लगेच पाणी सुटते, त्यामुळे ही मच्छी शिजवताना त्यात अजिबात पाणी घालू नये कारण कोळंबीची मच्छी वाफेवर उत्तम प्रकारे शिजते. 
६) मग कढईवर झाकण ठेवून २० ते २५ मिनिटे कोळंबीची मच्छी मंद आचेवर शिजवून घ्या. २५ मिनिटांनी झाकण काढून कोळंबीची मच्छी व्यवस्थित शिजली आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी ती बोटाने दाबून बघा, नरम झालेली दिसेल. मग गॅस बंद करून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. अशा प्रकारे चटपटीत, मसालेदार आणि चविष्ट कोळंबी मसाला या कोकण विशेष पदार्थाचा आस्वाद गरमागरम भाकरी किंवा मऊ, लुसलुशीत भातासोबत घेता येऊ शकतो.                

चव :

चटपटीत आणि मसालेदार