मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

भेंड्याची भाजी (भेंडी, भेंडी मसाला रेसिपी मराठी, भेंडी खाण्याचे फायदे, भेंडी फ्राय रेसिपी, भेंडी भाजी, भेंडी भाजी रेसिपी, भेंडीची भाजी, भेंडीची भाजी रेसिपी, भेंडीची भाजी दाखवा, भेंडीची भाजी कशी बनवायची, भेंडीची भाजी कशी करायची, भेंडीची भाजी कशी करावी, भेंडीची चव चांगली आहे का?, भेंडीचा फायदा काय?, भेंडीची भाजी खाण्याचे फायदे, भेंड्याची भाजी)

भेंड्याची भाजी 

भेंड्याची भाजी

Links To Read Blog On Bhendyachi Bhaji In Other Languages :

Blog On Bhendyachi Bhaji In English

पदार्थाविषयी माहिती :

भेंड्याची भाजी हा पदार्थ केवळ कोकण प्रांतात नव्हे तर अवघ्या भारतात फार प्रसिद्ध पदार्थ आहे आणि भेंड्याची भाजी ही वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे आवडीनुसार बनवली जाते, परंतु कोकण विभागात भेंड्याची भाजी बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि सर्वसाधारणपणे नाश्त्याला चपाती किंवा भाकरीसोबत या भाजीचा आस्वाद घेता येऊ शकतो. 

विशेषता :

भेंड्याची भाजी या पदार्थाची प्रमुख विशेषता म्हणजे या भाजीचा चवदरपणा होय. कोकणात भाजीची चव अधिक वाढवण्यासाठी फोडणीत हिरवी मिरची आणि भाजी बनवून झाल्यानंतर कातलेल्या ओल्या खोबऱ्याचा वापर केला जातो, त्यामुळे भाजीची चव हिरव्या मिरचीमुळे काहीशी तिखट आणि ओल्या खोबऱ्यामुळे काहीशी गोड आणि चविष्ट लागते. 

साहित्य :

१) तेल
२) पाच ते सहा कढीपत्त्याची पाने
३) दोन ते तीन भाग करून घेतलेल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या 
४) दोन ते तीन बारीक चिरलेले कांदे 
५) चार ते पाच कोकम 
६) हळद 
७) अर्धा किलो भेंडी 
८) मीठ 
९) अर्धा वाटी कातलेले ओले खोबरे

कृती :

१) भेंड्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम अर्धा किलो भेंडी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि मग एक एक करून ही सर्व भेंडी रुमालाचा साहाय्याने व्यवस्थित पुसून घ्या. 
२) भेंडी नीट पुसून घेतल्यावर त्याचे विळीवर किंवा सुरीच्या मदतीने एक एक करून सर्व भेंड्याचे देठ कापून भाजी बारीक चिरून घ्या. त्यानंतर गॅस चालू करा, त्यावर एक कढई ठेवा. गॅस मध्यम आचेवर करून कढईत चार ते पाच चमचे तेल घाला आणि तेल गरम झाले की त्यात ही बारीक चिरून घेतलेली भेंड्याची भाजी घाला. ही सर्व भेंडी चांगल्या प्रकारे लालसर तांबूस रंगाची होईपर्यंत सात ते आठ मिनिट तेलात भाजून घ्या. भाजीतून काहीशी वाफ आल्यानंतर त्यात चार ते पाच कोकम घालून चवीसाठी किंचित मीठ घाला (नंतर मीठ घालायचे असल्यामुळे या वेळेस थोडेसे अंदाजे मीठ घाला, जेणेकरून ते भेंड्याच्या भाजीत चांगले मुरेल. ) आणि पुन्हा भाजी चमच्याने परतून लालसर होईपर्यंत तेलात भाजून घ्या, भेंड्याची भाजी व्यवस्थित शिजली आहे की नाही हे पाहण्यासाठी ती चमच्याने दाबून बघा, ती नरम झाल्यासारखी दिसेल. मग गॅस बंद करून ही सर्व भाजी एका ताटात काळजीपूर्वक पद्धतीने काढून घ्या. 
३) त्यानंतर गॅस चालू करून त्यावर हीच कढई ठेवा, गॅस मध्यम आचेवर करून त्यात दोन ते तीन चमचे तेल घाला, तेल चांगले गरम झाले की गॅस मंद आचेवर करून त्यात पाच ते सहा कढीपत्त्याची पाने आणि दोन ते तीन भाग करून घेतलेल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या घाला, तेल गरम असल्यामुळे तेलात कढीपत्ता आणि मिरच्या व्यवस्थित भाजल्या जातील आणि त्यातून कढीपत्त्याचा हलकासा सुगंध आणि मिरच्यांचा तिखट स्वाद येईल. 
४) मग त्यात दोन ते तीन बारीक चिरलेले कांदे घाला. गॅस पुन्हा मध्यम आचेवर करून कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्या. कांदा तेलात लालसर झाल्यानंतर त्यात चिमूटभर हळद घाला. लगेचच ताटात काढून घेतलेली भेंड्याची भाजी या फोडणीत घाला. मग त्यात चवीनुसार अंदाजे मीठ घाला कारण अगोदर भेंड्याची भाजी तेलात भाजून घेताना आपण त्यात किंचित मीठ घातले होते, म्हणून त्या अंदाजाने भाजीत मीठ घाला. नंतर भेंड्याची भाजी चमच्याने व्यवस्थित परतून घ्या आणि गॅस मंद आचेवर करून त्यावर झाकण ठेवून द्या म्हणजे भेंड्याच्या भाजीत कढीपत्ता, मिरची, कांदा, हळद आणि मीठ यांचा स्वाद चांगला एकजीव होईल. अगोदर भाजी शिजवल्यामुळे भेंड्याची भाजी बनण्यासाठी फार वेळ लागणार नाही. 
५) चार ते पाच मिनिटांनी कढईवरील झाकण काढून बघा, भेंड्याच्या भाजीतून खूप छान सुगंध दरवळेल. मग त्यात अर्धा वाटी कातलेले ओले खोबरे घालून भाजी व्यवस्थित परतून घ्या आणि एक ते दोन मिनिटांनी गॅस बंद करा. अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये भेंड्याची गरमागरम, हळदीमुळे किंचित पिवळसर, मिरचीमुळे काहीशी तिखट आणि ओल्या खोबऱ्याच्या गोडव्याने हलकीशी गोड अशी तिखट, गोड आणि चवदार या संमिश्र चवींनी परिपूर्ण भाजी भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी तयार होईल.       

चव : 

मिरचीमुळे तिखट आणि ओल्या खोबऱ्यामुळे चविष्ट