मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

गरमागरम बटाटे वडे (बटाटे वडे, बटाटे वडे रेसिपी, बटाटे वडे कसे बनवायचे, बटाटे वडे ची रेसिपी, बटाटे वडा रेसिपी, बटाटा वडा, वडा पाव रेसिपी, बटाटा वडा रेसिपी, बटाटा वडा कसा करतात, बटाटा वडा फोटो, बटाटा वडा कसा बनवायचा, बटाटा वडा रेसिपी मराठी, बटाटा वडा रेसिपी इन मराठी, वडा पाव रेसिपी दाखवा, वडा पाव भाजी, वडा पाव रेसिपी मराठी, वडा पाव कसे बनवतात, वडा पाव रेसिपी मराठीमध्ये, वडा पाव रेसिपी इन मराठी)

गरमागरम बटाटे वडे 

गरमागरम बटाटे वडे (बटाटे वडे, बटाटे वडे रेसिपी, बटाटे वडे कसे बनवायचे, बटाटे वडे ची रेसिपी, बटाटे वडा रेसिपी, बटाटा वडा, वडा पाव रेसिपी, बटाटा वडा रेसिपी, बटाटा वडा कसा करतात, बटाटा वडा फोटो, बटाटा वडा कसा बनवायचा, बटाटा वडा रेसिपी मराठी, बटाटा वडा रेसिपी इन मराठी, वडा पाव रेसिपी दाखवा, वडा पाव भाजी, वडा पाव रेसिपी मराठी, वडा पाव कसे बनवतात, वडा पाव रेसिपी मराठीमध्ये, वडा पाव रेसिपी इन मराठी)
गरमागरम बटाटे वडे

Links To Read Blog On Garamagaram Batate Vade In Other Languages :

Blog On Garamagaram Batate Vade In English

पदार्थाविषयी माहिती :

गरमागरम बटाटे वडे हा पदार्थ फक्त कोकण प्रांतात किंवा फक्त महाराष्ट्र प्रांतात किंवा फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरात फार प्रसिद्ध आहे आणि बहुतेक सर्वांनाच बटाटे वडे हा पदार्थ अतिशय आवडतो. खरे पाहता बटाटे वडे हा मुंबईत खूप प्रसिद्ध असलेला अव्वल क्रमांकाचा आणि उत्कृष्ट चवीचा दर्जेदार पदार्थ आहे. बटाटे वडे असे नाव जरी ऐकू आले तरी कित्येकांच्या तोंडाला चटकन पाणी सुटते. जगात बहुतेक ठिकाणी बटाटे वडे हा पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो, शिवाय बहुतेक ठिकाणी बनवल्या जाणाऱ्या बटाट्याच्या वड्यांची चव ही देखील वेगवेगळी असते. प्रत्येक ठिकाणी बटाटे वडे बनवण्याची पद्धत देखील निरनिराळी आढळून येते. बटाटे वडे हे काही ठिकाणी पावासोबत आणि चटणीसोबत खाल्ले जातात, तर काही ठिकाणी बटाटे वडे हे उसळ किंवा कटाच्या आमटी बरोबर खाण्यासाठी बनवले जातात. बटाटे वडे हा पदार्थ बनवण्यासाठी अतिशय सोपा असून कोकण प्रांतात देखील हा पदार्थ विशेष प्रसिद्ध आहे. कोकणात बहुतेक ठिकाणी बाजारपेठांमध्ये किंवा खाऊ गल्ल्यांमध्ये लहान मोठ्या स्वरूपाची नाश्त्याची उपहारगृहे दिसून येतात, या सर्व ठिकाणी बटाटे वडे हा पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवला जातो कारण हा कित्येक लोकांच्या आवडीचा पदार्थ आहे. वाटण्याची किंवा चण्याची उसळ यासोबत किंवा कटाची आमटी किंवा कटवडा अशा वेगवगेळ्या पदार्थांमधून आपल्याला बटाट्याच्या वड्यांचा आस्वाद घेता येऊ शकतो. कोकणात देखील बटाटे वडे हा पदार्थ खूप प्रसिद्ध असून गणपती उत्सवात भजन मंडळींसाठी खाशी बेत म्हणून देखील हा पदार्थ विशेष आवडीने बनवला जातो. 

विशेषता :

गरमागरम बटाटे वडे या पदार्थाची विशेषता काय आहे हे सर्वांनाच ठाऊक असेल कारण हा बहुतेक सर्वांना हा पदार्थ अतिशय आवडतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात हा पदार्थ फार प्रसिद्ध आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा किंवा अगदी कोणत्याही मोसमात गरमागरम बटाटे वडे हा पदार्थ घरोघरी बनवता येऊ शकतो. थंडीच्या मोसमात तर गरमागरम बटाटे वडे आणि चहा हा अनेक लोकांचा आवडीचा बेत असतो. म्हणूनच या पदार्थाचा मनसोक्त आस्वाद घेणे हीच या पदार्थाची मुख्य विशेषता आहे. बटाटे वडे बनवण्यासाठी उकडलेल्या बटाट्यांपासून बनवल्या जाणाऱ्या पिवळ्या भाजीची आवश्यकता असते आणि ही फार त्वरित होणारी भाजी आहे, त्यामुळे भाजी एकदा बनवून झाली की मग गरमागरम बटाटे वडे बनवायला फारसा वेळ लागत नाही. बटाटे वडे गरम असताना खाण्यातच जास्त मज्जा असते, या पदार्थाचा आस्वाद तिखट चटणी, गोड चटणी किंवा खोबऱ्याची तिखट चटणी किंवा घाटी मसाला किंवा आवडीनुसार टोमॅटोच्या सॉस सोबत घेता येऊ शकतो.   

साहित्य :

१) तेल
२) मोहरी
३) जिरे
४) आठ ते दहा कढीपत्त्याची पाने
५) बारीक कापून घेतलेला आल्याचा अर्धा तुकडा
६) बारीक कापून घेतलेल्या पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या
७) बारीक कापून घेतलेल्या सात ते आठ हिरव्या मिरच्या
८) हळद
९) मीठ
१०) दहा ते बारा बटाटी
११) पाणी
१२) कोथिंबीर
१३) चण्याचे पीठ
१४) खाण्याचा सोडा

कृती :

१) गरमागरम बटाटे वडे बनवण्यासाठी पहिल्यांदा उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी बनवावी लागते. उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा दहा ते बारा बटाटी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून बटाट्यांच्या सालीला असणारी माती निघून जाईल. नंतर या दहा ते बारा बटाट्यांचे दोन समान भाग करून घ्या आणि मग गॅस चालू करून त्यावर एका मोठ्या टोपात पाणी घेऊन त्या टोपात ही दोन भाग करून घेतलेली सर्व बटाटी घाला. मोठ्या आचेवर ही सर्व बटाटी व्यवस्थित उकडवण्यासाठी १५ मिनिटे ठेवून द्या. १५ मिनिटांनी टोपातील बटाटी शिजली आहेत की नाही याची खात्री करून घेण्यासाठी त्यात काट्याचा चमचा उभा खुपसून बघा. जर चमचा बटाट्यात गेला तर बटाटे व्यवस्थित शिजले आहे याची खात्री करून घेता येईल. मग गॅस बंद करा आणि या टोपातील गरम पाणी बटाट्यांमधून काळजीपूर्वक काढून टाका. ही सर्व बटाटी थंड झाल्यावर त्याची साल काढून घ्या. कारण थंड बटाट्यांच्या साली पटकन निघतात, त्यामुळे बटाट्यांची साल काढून घेण्याचे काम त्वरित होईल.
२) भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या ताटामध्ये उकडवून घेतलेल्या आणि साल काढून घेतलेल्या दहा ते बारा बटाट्यांच्या सुरीच्या मदतीने समान आकाराच्या फोडी करून घ्या. एकदा का उकडवून घेतलेल्या बटाट्यांच्या फोडी करून घेतल्या की उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी बनवण्याचे काम अगदी सोपे होऊन जाते.
३) त्यानंतर गॅस चालू करून त्यावर एक मोठी कढई ठेवा, कढई चांगली तापल्यानंतर त्यात दहा ते बारा चमचे तेल घाला, मग गॅस मंद आचेवर करून त्यात अर्धा चमचा मोहरी घाला, मोहरी तेलात व्यवस्थित तडतडल्यावर फोडणीत मोहरीचा खूप छान सुगंध दरवळेल, मग त्यात अर्धा चमचा जिरे आणि आठ ते दहा कढीपत्त्याची पाने घाला. फोडणीत मोहरी, जिरे आणि कढीपत्ता व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात लगेचच बारीक कापून घेतलेला आल्याचा अर्धा तुकडा, बारीक कापून घेतलेल्या पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या आणि बारीक कापून घेतलेल्या सात ते आठ हिरव्या मिरच्या घाला. तेलात ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घेतल्यावर फोडणीत आल्याचा आणि लसणीचा हलकासा सुगंध येईल आणि त्यातील मिरच्या भाजल्यानंतर फोडणीतून मिरच्यांचा तिखट स्वाद येईल.
४) यानंतर लगेचच या फोडणीत अर्धा चमचा हळद घाला आणि मोठ्या ताटामध्ये समान आकाराच्या फोडी करून घेतलेली उकडलेली बटाटी या फोडणीत घाला.
५) मग त्यात चवीनुसार मीठ घालून सर्व भाजी व्यवस्थित परतून घ्या म्हणजे सर्व फोडणी, हळद आणि मीठ हे बटाट्यांना व्यवस्थित लागेल. पुढे गॅस मध्यम आचेवर करून १० ते १५ मिनिटे बटाट्याची भाजी वाफेवर शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवा. कारण बटाट्याची भाजी वाफेवर शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही, जर गॅस मध्यम आचेवर करून भाजी शिजवली तर ती करपून जाण्याची शक्यता असते. यासाठी मंद आचेवर भाजी शिजण्यासाठी ठेवून द्या.
६) बटाटी उकडवून घेतल्यामुळे भाजी शिजवण्यासाठी त्यात अजिबात पाणी घालू नका, ही भाजी वाफेवर पटकन शिजते आणि वाफेवर शिजवल्यामुळे फोडणीतील सर्व जिन्नस आणि मीठ बटाटयाच्या भाजीला व्यवस्थित लागते. दहा ते पंधरा मिनिटांनंतर काळजीपूर्वक कढईवरील झाकण काढून बघा, भाजीतून खमंग सुवास येईल. भाजी व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करा आणि मग भाजीवर बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घाला.
७) अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये उकडलेल्या बटाट्यांची गरमागरम, हिरव्या मिरच्यांमुळे स्वादिष्ट आणि खमंग अशी उत्कृष्ट पिवळी भाजी तयार झाली की मग भाजी तीन ते चार मिनिटे थंड होऊ द्या. भाजी थंड झाल्यावर तळ हातावर थोडेसे तेल लावून हाताने या भाजीचे गोलाकार गोळे बनवून घ्या.
८) त्यानंतर एक टोप घेऊन त्यात दोन वाटी किंवा आवश्यकतेनुसार चण्याचे पीठ घ्या, त्यात चिमूटभर खाण्याचा सोडा, चवीनुसार मीठ घाला आणि मग हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्या, नंतर यात अंदाजे थोडे थोडे पाणी घाला आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. चण्याच्या पिठाचे मिश्रण बनवताना ते जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बनणार नाही, याची काळजी घ्या.
९) मग गॅस चालू करून त्यावर एक मोठी कढई ठेवा, त्यात आवश्यकतेनुार बटाटे वडे तळून घेण्यासाठी तेल घाला, गॅस मध्यम आचेवर करून तेल गरम होण्यासाठी ठेवून द्या. तेल गरम झाले की मग गॅस कमी आचेवर करून घ्या. तयार करून घेतलेले बटाट्याच्या भाजीचे गोळे या चण्याच्या पिठाच्या मिश्रणात घोळवून घ्या, जेणेकरून पीठ सर्वत्र गोळ्यांना व्यवस्थित लागेल. मग एका वेळेस तीन ते चार वडे या तेलात अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने सोडा. झाऱ्याच्या साहाय्याने हळुवारपणे वडे हलवत राहा, असे केल्याने वडे तेलात अगदी चांगल्या प्रकारे तळले जातील. बटाटे वडे एका बाजूने तळले गेल्यानंतर मग दुसऱ्या बाजूने परतून घ्या आणि लालसर तांबूस रंगाचे झाल्यावर झाऱ्याच्या मदतीने बटाटे वडे तेल गाळून एका ताटात काढून घ्या. 
१०) अशा पद्धतीने उरलेले बटाटे वडे देखील तेलात चांगले खमंग तळून घ्या. या तऱ्हेने गरमागरम बटाटे वडे हे पावासोबत किंवा आवडीनुसार तिखट चटणी किंवा सॉस सोबत खाण्यासाठी तयार होतील.

चव :

गरमागरम, चविष्ट, खमंग आणि झणझणीत