मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

साबुदाण्याची खिचडी (साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खिचडी कशी बनवतात ते दाखवा, साबुदाण्याची खिचडी कशी करतात, साबुदाण्याची खिचडी दाखवा, साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची दाखवा, उपवासाची साबुदाणा खिचडी, साबुदाणा खिचडी रेसिपी इन मराठी, साबुदाणा खिचडी, साबुदाणा खिचडी रेसिपी, साबुदाणा खिचडी रेसिपी इन मराठी, साबुदाणा खिचडी दाखवा, साबुदाणा खिचडी कशी करावी, साबुदाणा खिचडी बनवणे, साबुदाणा खिचडी खाण्याचे फायदे, साबुदाणा खिचडी बनवण्याची पद्धत)

साबुदाण्याची खिचडी

साबुदाण्याची खिचडी (साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खिचडी कशी बनवतात ते दाखवा, साबुदाण्याची खिचडी कशी करतात, साबुदाण्याची खिचडी  दाखवा, साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची दाखवा, उपवासाची साबुदाणा खिचडी, साबुदाणा खिचडी रेसिपी इन मराठी, साबुदाणा खिचडी, साबुदाणा खिचडी रेसिपी, साबुदाणा खिचडी रेसिपी इन मराठी, साबुदाणा खिचडी दाखवा, साबुदाणा खिचडी कशी करावी, साबुदाणा खिचडी बनवणे, साबुदाणा खिचडी खाण्याचे फायदे, साबुदाणा खिचडी बनवण्याची पद्धत)
साबुदाण्याची खिचडी

Links To Read Blog On Sabudanyachi Khichadi In Other Languages :

Blog On Sabudanyachi Khichadi In English

पदार्थाविषयी माहिती :

साबुदाण्याची खिचडी हा पदार्थ सर्वांच्या ओळखीचा असेलच आणि बहुतेक सर्वांना साबुदाण्याची खिचडी खायला अतिशय आवडते. अवघ्या महाराष्ट्रात साबुदाण्याची खिचडी हा फार लोकप्रिय पदार्थ असून उपहारगृह, खानावळ, छोटी मोठी नाश्त्याची दुकाने इत्यादी ठिकाणी साबुदाण्याची खिचडी, कांदे पोहे, उपमा इत्यादी स्वादिष्ट पदार्थ खाण्यासाठी सहजपणे उपलब्ध होतात आणि सर्व ठिकाणी साबुदाण्याची खिचडी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. मात्र कोकण विभागात साबुदाण्याची खिचडी हा पदार्थ विशेषतः उपवासाच्या दिवशी बनवला जातो आणि कोकणात साबुदाण्याची खिचडी हा पदार्थ बनवण्याची पद्धत ही फार सोपी आहे. त्यामुळे उपवासाच्या दिवशी किंवा नाश्त्याचा अत्यंत उत्कृष्ट, खमंग आणि चविष्ट असा बेत म्हणून साबुदाण्याची खिचडी हा कोकण विशेष पदार्थ बनवता येऊ शकतो.

विशेषता :

साबुदाण्याची खिचडी हा प्रामुख्याने उपवासाला बनवला जाणारा एक अत्यंत उत्तम पदार्थ आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्र प्रांतात प्रसिद्ध आहे, हीच या पदार्थाची प्रमुख विशेषता आहे. याशिवाय साबुदाण्याची खिचडी आणखी स्वादिष्ट बनवण्यासाठी या पदार्थामध्ये शेंगदाण्याचा कुट, बटाटा घातला जातो, ज्यामुळे पदार्थ अतिशय रुचकर बनतो. बहुतेक सर्वांना शेंगदाणा आणि बटाटा घालून बनवलेले पदार्थ खाण्यासाठी अधिक आवडतात. साबुदाण्याची खिचडी हा पदार्थ केवळ उपवासाच्या दिवशी नव्हे तर इतर दिवशी देखील आवडीनुसार नाश्त्याला बनवता येणारा एक अप्रतिम पदार्थ आहे.

साहित्य :

१) तेल
२) तूप
३) दहा ते बारा कढीपत्त्याची पाने
४) जिरे
५) चार ते पाच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
६) मीठ
७) साखर
८) दोन ते तीन बटाटी
९) अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट
१०) दोन वाटी साबुदाणे

कृती :

१) साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी भिजवलेले साबुदाणे आवश्यक असतात म्हणून ज्या दिवशी साबुदाण्याची खिचडी बनवायची असेल त्याच्या आधीच्या दिवशी रात्रीच्या वेळेस दोन वाटी साबुदाणे हे एका मोठ्या टोपात पाण्यामध्ये भिजत घाला. साबुदाणे भिजत घालण्यासाठी एका मोठा टोप घ्या, त्यात दोन वाटी साबुदाणे घाला आणि त्या टोपामध्ये असलेल्या साबुदाण्यांच्या अर्धा इंच वर राहील एवढे पाणी घाला आणि टोपावर ताट ठेवून द्या.
२) सकाळी टोपावरील ताट काढून पाहिले तर त्यातील पाणी निघून गेलेले दिसेल कारण साबुदाण्यांनी पाणी शोषून घेतले आणि त्यामुळे साबुदाण्यांचा आकार वाढून ते फुगीर झाल्याचे दिसून येईल.
३) अशा पद्धतीने साबुदाणे भिजवून घेतल्यानंतर त्या टोपात अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट, दोन चमचे साखर आणि चवीनुसार मीठ घाला. मग हे सर्व मिश्रण काट्याच्या चमचाच्या साहाय्याने एकजीव करून घ्या. मिश्रण एकजीव करण्यासाठी काट्याचा चमचा वापरल्याने भिजवलेले साबुदाणे कुस्करत नाहीत आणि साबुदाणे लगेच सुट्टे होतात.
४) मग चार ते पाच बटाटी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून बटाट्यांच्या सालीला असणारी माती निघून जाईल. नंतर सोलण्याच्या साहाय्याने चार ते पाच बटाट्यांची साल काढून बटाट्यांचे चार भाग करून नंतर त्यांचे बारीक काप करून घ्या. एका टोपात पाणी घेऊन त्यात ही बारीक कापलेली बटाटी भिजत ठेवा, असे केल्याने बटाट्यांच्या कापांचा रंग लालसर होणार नाही, शिवाय बटाट्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जाईल.
५) त्यानंतर साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी प्रथम गॅस चालू करा, गॅस मध्यम आचेवर करून त्यावर एक मोठा टोप ठेवा. त्यात दोन चमचे तूप घाला, तूप गरम होऊन व्यवस्थित वितळल्यावर तूपाचा खमंग वास येईल. मग गॅस मंद आचेवर करून त्यात एक चमचा जिरे, दहा ते बारा कढीपत्त्याची पाने, चार ते पाच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. हे सर्व जिन्नस तुपात चांगले भाजून घ्या, हिरव्या मिरच्या लालसर रंगाच्या होईपर्यंत एका बाजूला टोपात भिजत ठेवलेल्या बटाट्यांच्या कापांतील पाणी काढून टाका. हिरव्या मिरच्या लालसर झाल्या की या फोडणीत हे पाणी काढून घेतलेले बटाट्यांचे काप घाला आणि हे काप तुपात व्यवस्थित परतून घ्या आणि खिचडीतील बटाट्यांना मीठ लागण्यासाठी यात चिमुटभर मीठ घाला.
६) मग या टोपावर झाकण ठेवून आठ ते दहा मिनिटे ही बटाटी मंद आचेवर वाफेवर शिजण्यासाठी ठेवून द्या. 
७) दहा मिनिटांनंतर टोपावरील झाकण काढून बटाटी शिजली आहेत की नाही हे पाहण्यासाठी बटाट्यांच्या कापात चमचा उभा खुपसून बघा, जर बटाटे सहज कापले गेले तर बटाटे शिजले आहे अशी खात्री करून घेता येईल.
८) बटाट्यांचे काप व्यवस्थित शिजल्यावर यात हे टोपातील साबुदाण्याचे मिश्रण घाला आणि सर्व फोडणी, बटाट्यांचे काप मिश्रणाला सर्वत्र लागण्यासाठी व्यवस्थित परतून घ्या आणि मग या टोपावर ताट ठेवून हे साबुदाण्याचे मिश्रण पाच ते दहा मिनिटे मंद आचेवर वाफेवर शिजण्यासाठी ठेवून द्या. (साबुदाण्याची खिचडी बनवताना त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालता येऊ शकते, परंतु कोकणात साबुदाण्याची खिचडी हे खास उपवासाच्या दिवशी आवडीने बनवली जाते आणि उपवासाला कोथिंबीर खात नाहीत म्हणून यात कोथिंबीर वापरण्यात आलेली नाही, आपल्या आवडीनुसार पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी आपण यात कोथिंबीर वापरू शकता. )
९) पाच ते दहा मिनिटांनंतर रुमालाच्या साहाय्याने अतिशय काळजीपूर्वक पद्धतीने टोपावरील ताट उचलून बाजूला ठेवा, साबुदाण्याच्या खिचडीचा फार अप्रतिम सुगंध दरवळेल. मग गॅस बंद करा.
१०) अशा प्रकारे खमंग, स्वादिष्ट आणि अतिशय रुचकर अशी उपवासाची गरमागरम साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी तयार होतील.

चव :

साखरेमुळे किंचित गोड पण हिरव्या मिरचीमुळे तिखट, चवदार, स्वादिष्ट आणि खमंग