मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

साबुदाणे वडे (साबुदाणे वडे, साबुदाणे वडे कसे बनवतात, साबुदाणे वडे कसे बनवावे, साबुदाणे वडे बनवणे, साबुदाणे वडे रेसिपी, साबुदाणे वडे मराठी रेसिपी, साबुदाणे वडे बनवण्याची पद्धत, साबुदाणे वडे कसे करायचे, साबुदाणा वडा, साबुदाणा वडा कसा बनवायचा, साबुदाणा वडा रेसिपी इन मराठी,साबुदाणा वडा रेसिपी मराठी, साबुदाणा वडा कसा बनवतात, साबुदाणा वडा कसा करतात, उपवासाचा पदार्थ)

साबुदाणे वडे

साबुदाणे वडे (साबुदाणे वडे, साबुदाणे वडे कसे बनवतात, साबुदाणे वडे कसे बनवावे, साबुदाणे वडे बनवणे, साबुदाणे वडे रेसिपी, साबुदाणे वडे मराठी रेसिपी, साबुदाणे वडे बनवण्याची पद्धत, साबुदाणे वडे कसे करायचे, साबुदाणा वडा, साबुदाणा वडा कसा बनवायचा, साबुदाणा वडा रेसिपी इन मराठी,साबुदाणा वडा रेसिपी मराठी, साबुदाणा वडा कसा बनवतात, साबुदाणा वडा कसा करतात, उपवासाचा पदार्थ)
साबुदाणे वडे

Links To Read Blog On Sabudane Vade In Other Languages :

Blog On Sabudane Vade In English

पदार्थाविषयी माहिती :

साबुदाणे वडे हा पदार्थ बहुतेक सर्वांना माहीत असेलच आणि निश्चितच हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा असेल, यात शंका नाही. आपल्या कोकणात साबुदाणे वडे हा पदार्थ प्रसिद्ध असून उपवासाच्या दिवशी विशेष बनवला जातो आणि कोकण विभागात साबुदाणे वडे बनवण्याची पद्धत ही अतिशय सोपी आहे. कोकण प्रांतात साबुदाणे वडे याबरोबरच साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खीर हे उपवासाचे खमंग पदार्थ देखील फार प्रसिद्ध असून हे पदार्थ खूप लोकप्रिय देखील आहेत. उपवसाच्या दिवशी काही लोक फराळी चिवडा, वेफर्स असे पदार्थ बाहेरून विकत आणून खातात, परंतु या पदार्थांऐवजी आपण घरच्या घरी देखील साबुदाणे वडे हा उपवासाचा अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवू शकतो, ज्या पदार्थाची चव फार उत्कृष्ट लागते आणि त्यात उकडलेला बटाटा, शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे या पदार्थाची चव अधिक वाढते. यशिवाय उपवासाच्या दिवशी हा पदार्थ खाल्ल्यास लागणारी भूक देखील क्षमते. कोकणात आणि अवघ्या महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध असणारा साबुदाणे वडे हा पदार्थ साबुदाण्यांपासून बनवला जातो आणि साबुदाणा खाण्याचे देखील बरेच फायदे आहेत, साबुदाण्यात पिष्टमय पदार्थ हे अधिक प्रमाणात असतात, परंतु यात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण हे फार कमी असते, म्हणून साबुदाण्यापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांचा आपण आहारात समावेश करू शकतो. साबुदाणे पचनाला हलके असतात, त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. साबुदाण्यांचा अत्यंत महत्वाचा फायदा असा की उपवासाच्या दिवशी शरीरातील उष्णतेचे प्रमाण हे अधिक वाढते त्यामुळे उपवासाच्या दिवशी साबुदाण्याचे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. असे गुणकारी फायदे असलेल्या आणि उपवासाला चालणाऱ्या साबुदाण्यांपासून बनवले जाणारे पदार्थ आपण नाश्त्याला बनवून खाऊ शकतो.

विशेषता :

साबुदाणे वडे या पदार्थाची प्रमुख विशेषता म्हणजे हा पदार्थ तेलात तळल्यामुळे पदार्थातून येणारा खमंग स्वाद, पदार्थाचा कुरकुरीतपणा आणि पदार्थाची रुचकर चव होय. साबुदाणे वडे हे गरम असल्यावर छान कुरकरीत असतात त्यामुळे वडे गरमागरम असतानाच खाण्यात अधिक मज्जा असते. साबुदाण्याच्या वड्यांमध्ये हिरवी मिरची वापरल्यामुळे वड्यांची चव काहीशी तिखट बनते, तेव्हा लस्सी, गोड दही किंवा आवडीनुसार फक्त दह्यासोबात साबुदाणे वडे यांचा आस्वाद घेता येऊ शकतो. साबुदाणे वडे हे दोन प्रकारे बनवता येऊ शकतात एक म्हणजे उपवासासाठी आणि दुसरे म्हणजे नाश्त्याला गरमागरम बेत म्हणून बनवता येऊ शकतात. कोकण विभागात खास उपवासाला साबुदाणे वडे बनवताना त्यात कोथिंबीर घातली जात नाही कारण कोकणात उपवासाच्या दिवशी कोथिंबीर घातलेले पदार्थ खात नाहीत. तसेच इतर दिवशी नाश्त्याला गरमागरम बेत म्हणून साबुदाणे वडे बनवताना त्यात आवडीनुसार कोथिंबीर घालता येऊ शकते. 

साहित्य :

१) तेल
२) तूप
३) दहा ते बारा कढीपत्त्याची पाने
४) जिरे
५) चार ते पाच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
६) मीठ
७) साखर
८) चार ते पाच उकडलेली बटाटी
९) अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट
१०) दोन वाटी साबुदाणे
११) अर्धा वाटी आरारोटचे पीठ

कृती :

१) साबुदाणे वडे बनवण्यासाठी भिजवलेले साबुदाणे आवश्यक असतात म्हणून ज्या दिवशी साबुदाणे वडे बनवायचे असतील त्याच्या अगोदरच्या दिवशी रात्रीच्या वेळेस दोन वाटी साबुदाणे हे एका मोठ्या टोपात पाण्यामध्ये भिजत घाला. साबुदाणे भिजत घालण्यासाठी एका मोठा टोप घ्या, त्यात दोन वाटी साबुदाणे घाला आणि त्या टोपामध्ये असलेल्या साबुदाण्यांच्या अर्धा इंच वर राहील एवढे पाणी घाला आणि टोपावर ताट ठेवून द्या.
२) सकाळी टोपावरील ताट काढून पाहिले तर त्यातील पाणी निघून गेलेले दिसेल कारण साबुदाण्यांनी पाणी शोषून घेतले आणि त्यामुळे साबुदाण्यांचा आकार वाढून ते फुगीर झाल्याचे दिसून येईल.
३) अशा पद्धतीने साबुदाणे भिजवून घेतल्यानंतर त्या टोपात अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट, दोन चमचे साखर आणि चवीनुसार मीठ घाला. मग हे सर्व मिश्रण काट्याच्या चमचाच्या साहाय्याने एकजीव करून घ्या. मिश्रण एकजीव करण्यासाठी काट्याचा चमचा वापरल्याने भिजवलेले साबुदाणे कुस्करत नाहीत आणि साबुदाणे लगेच सुट्टे होतात.
४) त्यानंतर साबुदाणे वडे बनवण्यासाठी या मिश्रणाची खिचडी बनवून घेणे आवश्यक असते, त्याकरीता या मिश्रणाला फोडणी देण्यासाठी प्रथम गॅस चालू करा, गॅस मध्यम आचेवर करून त्यावर एक मोठा टोप ठेवा. त्यात दोन चमचे तूप घाला, तूप गरम होऊन व्यवस्थित वितळल्यावर तूपाचा खमंग वास येईल. मग गॅस मंद आचेवर करून त्यात एक चमचा जिरे, दहा ते बारा कढीपत्त्याची पाने, चार ते पाच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. हे सर्व जिन्नस तुपात चांगले भाजून घ्या, हिरव्या मिरच्या लालसर रंगाच्या झाल्या की मग हे टोपातील साबुदाण्याचे मिश्रण या गॅसवरील टोपात घाला आणि सर्व फोडणी मिश्रणाला सर्वत्र लागण्यासाठी व्यवस्थित परतून घ्या आणि मग या टोपावर ताट ठेवून हे साबुदाण्याचे मिश्रण पाच ते दहा मिनिटे मंद आचेवर वाफेवर शिजण्यासाठी ठेवून द्या. (साबुदाण्याची खिचडी बनवताना त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालता येऊ शकते, परंतु कोकणात साबुदाणे वडे हे खास उपवासाच्या दिवशी आवडीने बनवले जातात आणि उपवासाला कोथिंबीर खात नाहीत म्हणून यात कोथिंबीर वापरण्यात आलेली नाही, आपल्या आवडीनुसार पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी आपण यात कोथिंबीर वापरू शकता. )
५) पाच ते दहा मिनिटांनंतर रुमालाच्या साहाय्याने अतिशय काळजीपूर्वक पद्धतीने टोपावरील ताट उचलून बाजूला ठेवा, साबुदाण्याच्या खिचडीचा फार अप्रतिम सुगंध दरवळेल. मग गॅस बंद करा.
६) एकदा का साबुदाण्याची खिचडी बनवून झाली की मग एक मोठी परात घ्या, त्यात चार ते पाच उकडलेली बटाटी किसणीच्या मदतीने किसून घ्या, नंतर त्यात ही साबुदाण्याची खिचडी, दोन चमचे आरारोटचे पीठ आणि बटाट्यांना चव येण्यासाठी त्यात चवीनुसार अंदाजाने थोडे मीठ घाला. आरारोटचे पीठ वापरल्याने साबुदाणे वडे व्यवस्थित बनतील, शिवाय तेलात तळून घेताना ते तुटणार नाहीत.
७) आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. नंतर या मिश्रणाचे गोलाकार चपटे वडे बनवण्यासाठी हातावर थोडे तेल लावा, जेणेकरून वडे बनवताना मिश्रण हाताला चिकटणार नाही. मग या मिश्रणात जेवढे बनवता येतील तेवढे मध्यम आकाराचे गोलाकार आणि चपटे साबुदाणे वडे बनवून घ्या.
८) मिश्रणाचे साबुदाणे वडे बनवून घेतल्यानंतर हे वडे तेलात तळून घेण्यासाठी गॅस चालू करा. त्यावर एक मोठी कढई ठेवा आणि या कढईत साबुदाणे वडे तळून घेण्यासाठी आवश्कतेनुसार तेल घाला.
९) गॅस मध्यम आचेवर करून कढईमधील तेल गरम होण्यासाठी ठेवून द्या. एकदा का तेल गरम झाले की गॅस मंद आचेवर करून घ्या आणि मग अतिशय काळजीपूर्वक पद्धतीने बनवलेले साबुदाण्याचे वडे तेलात हळूच सोडा. वडे तेलात सोडताना अंगावर तेल उडणार नाही याची विशेष काळजी घ्या. मंद आचेवर (मध्यम आचेवर किंवा मोठ्या आचेवर साबुदाणे वडे तळले तर ते करपून जाण्याची दाट शक्यता असते. ) हे सर्व साबुदाणे वडे तेलात लालसर तांबूस रंगाचे होईपर्यंत खरपूस तळून घ्या.
१०) साबुदाणे वडे लालसर तांबूस रंगाचे झाले की मग झाऱ्याच्या चमचाच्या साहाय्याने या वड्यांमधील तेल गाळून हे वडे एका ताटात काढून घ्या. अशा प्रकारे गरमागरम, स्वादिष्ट आणि कुरकुरीत असे उपवासाचे साबुदाणे वडे हे थंडगार लस्सी किंवा आवडीनुसार गोड दह्यासोबत खाण्यासाठी तयार होतील.

चव :

साखरेमुळे किंचित गोड पण हिरव्या मिरचीमुळे किंचित तिखट, चविष्ट, स्वादिष्ट, रुचकर आणि कुरकुरीत