मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

मटार टोमॅटोची मसालेदार भाजी (मटार, मटार खाण्याचे फायदे, मटार भाजी, मटार भाजी कशी बनवायची, मटार भाजी रेसिपी, टोमॅटो, टोमॅटो खाण्याचे फायदे, टोमॅटो चे फायदे, टोमॅटो भाजी, टोमॅटो भाजी रेसिपी मराठी, टोमॅटो भाजी रेसिपी, टोमॅटोची भाजी, टोमॅटोची भाजी रेसिपी, टोमॅटोची भाजी कशी बनवायची, टोमॅटोची भाजी कशी करायची, टोमॅटोची भाजी कशी बनवतात)

मटार टोमॅटोची मसालेदार भाजी

मटार टोमॅटोची मसालेदार भाजी (मटार, मटार खाण्याचे फायदे, मटार भाजी, मटार भाजी कशी बनवायची, मटार भाजी रेसिपी, टोमॅटो, टोमॅटो खाण्याचे फायदे, टोमॅटो चे फायदे, टोमॅटो भाजी, टोमॅटो भाजी रेसिपी मराठी, टोमॅटो भाजी रेसिपी, टोमॅटोची भाजी, टोमॅटोची भाजी रेसिपी, टोमॅटोची भाजी कशी बनवायची, टोमॅटोची भाजी कशी करायची, टोमॅटोची भाजी कशी बनवतात)
मटार टोमॅटोची मसालेदार भाजी

Links To Read Blog On Matar Tomatochi Masaledar Bhaji In Other Languages :

Blog On Matar Tomatochi Masaledar Bhaji In English

पदार्थाविषयी माहिती :

मटार टोमॅटोची मसालेदार भाजी ही भाजी फार उत्कृष्ट लागते आणि कोकण विभागात ही भाजी विशेषतः गव्हाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या चपातीसोबत किंवा तांदळाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवली जाते. चवीला आंबट, तिखट लागणारी मटार टोमॅटोची मसालेदार भाजी ही भाजी बनवायला अतिशय सोपी आणि वाफेवर पटकन शिजणारी भाजी आहे. मटार टोमॅटोची मसालेदार भाजी बनवण्यासाठी वापरला जाणारा टोमॅटो आणि मटार या भाज्यांचे खूप गुणकारी फायदे आहेत. आपल्या सर्वांना हे ठाऊक असेलच की आजकाल प्रत्येक भाजीमध्ये, डाळीमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो, याचे कारण असे की टॉमॅटो हा चवीला आंबट असल्यामुळे भाजीची, डाळीची चव अधिक चांगली लागते. टोमॅटोमध्ये सी जीवनसत्व, लाइकोपीन आणि पोटॅशियम हे घटक पुरेशा प्रमाणात आढळतात. टोमॅटोमध्ये प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय टॉमॅटो खाल्ल्याने रोगप्रतिकाशक्ती वाढवण्यासाठी मदत होते आणि टोमॅटो भाजी ही रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार या रोगांवर तर खूप फायदेशीर औषध आहे. टोमॅटोच्या भाजीप्रमाणेच ओला मटारच्या भाजीचे देखील बरेच फायदे आहेत. बहुतेक लोकांना मटारची भाजी आणि त्यापासून बनवले जाणारे पदार्थ खाण्यासाठी फार आवडतात, त्यामुळे जर टोमॅटोच्या भाजीत ओला मटार घातला तर भाजी अधिक रुचकर बनते. ओला मटार भाजीमध्ये तंतुमय पदार्थांचा समावेश असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते, तसेच पचनक्रिया सुधारते. मटार भाजीमध्ये अँटिऑक्सिडेन्ट आणि बरीच पोषक तत्वे असतात ज्यामुळे कर्करोगाला प्रतिबंध होतो. मटारमधील मॅग्नेशियम शरीरातील प्रतिरोधक क्षमता वाढवते आणि हृदयाचे स्वास्थ्य राखते. याशिवाय ओला मटार खाल्ल्याने शरीरातील वाढता कोलेस्टेरॉल नियंत्रित होण्यासाठी मदत होते. असंख्य फायद्यांनी परिपूर्ण अशा टोमॅटो आणि मटार या भाज्यांचा आपण नियमितपणे आहारात समावेश केला पाहिजे.

विशेषता :

कोकणात भाकरीसोबत खाण्यासाठी प्रसिद्ध असणारी मटार टोमॅटोची मसालेदार भाजी या पदार्थाची विशेषता म्हणजे या भाजीची आंबट तिखट चव होय. ही भाजी अत्यंत चविष्ट असून बहुतेक जण ही भाजी फार आवडीने देखील खातात. आणखी एक महत्वाची बाब अशी की मटार टोमॅटोची मसालेदार भाजी ही त्वरित होणारी भाजी असल्यामुळे जर वेळेची मर्यादा असेल तर ही भाजी त्यावरील उत्तम आणि चविष्ट भाजीचा पर्याय आहे. नाश्त्याला चपाती किंवा भाकरी यांसोबत खाण्यासाठी मटार टोमॅटोची मसालेदार भाजी ही फार उत्कृष्ट लागते आणि जर भाजीत कोकणात सुप्रसिद्ध असलेले कातलेले ओले खोबरे घातले तर भाजीची लज्जत आणखी वाढते.

साहित्य :

१) तेल
२) मोहरी
३) जिरे
४) सात ते आठ कढीपत्त्याची पाने
५) बारीक कापून घेतलेला आल्याचा अर्धा तुकडा
६) बारीक कापून घेतलेल्या पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या
७) एक बारीक चिरलेला कांदा
८) चार बारीक चिरलेले टोमॅटो
९) हळद
१०) मसाला
११) मीठ
१२) दोन वाटी सोलून घेतलेले ओले मटार
१३) कोथिंबीर

कृती :

१) मटार टोमॅटोची मसालेदार भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात दोन वाटी ओले मटार भिजत ठेवा, असे केल्याने मटार पाण्यात ताजे राहतील. नंतर गॅस चालू करून त्यावर एक मोठी कढई ठेवा, कढई चांगली तापल्यानंतर त्यात सहा ते सात चमचे तेल घाला, मग गॅस मंद आचेवर करून त्यात अर्धा चमचा मोहरी घाला, मोहरी तेलात व्यवस्थित तडतडल्यावर फोडणीत मोहरीचा खूप छान सुगंध दरवळेल, मग त्यात अर्धा चमचा जिरे आणि सात ते आठ कढीपत्त्याची पाने घाला. फोडणीत मोहरी, जिरे आणि कढीपत्ता व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात लगेचच बारीक कापून घेतलेला आल्याचा अर्धा तुकडा आणि बारीक कापून घेतलेल्या पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या घाला.
२) तेलात ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घेतल्यावर फोडणीत आल्याचा आणि लसणीचा हलकासा सुगंध येईल. त्यानंतर या फोडणीत एक बारीक चिरलेला कांदा घाला.
३) कढईतील ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घ्या, तेलात कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या. कांदा तेलात लालसर झाल्यानंतर त्यात दोन बारीक चिरलेले टोमॅटो घाला. ही सर्व भाजी व्यवस्थित ढवळून घ्या आणि मग कढईवर ५ मिनिटे झाकण ठेवून टोमॅटो वाफेवर शिजण्यासाठी ठेवून द्या. 
४) भाजीत टॉमॅटो शिजेपर्यंत दुसऱ्या बाजूला एका मोठ्या टोपात भिजत ठेवलेले दोन वाटी ओले मटार पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यातील पाणी काढून टाका. ५ मिनिटे झाल्यानंतर काळजीपूर्वक कढईवरील झाकण उघडून बघा, भाजीतील टोमॅटो नरम झालेला दिसेल, याचा अर्थ भाजीतील टोमॅटो शिजलेला आहे, मग त्यात अर्धा चमचा हळद, दीड चमचा मसाला घाला आणि पाणी काढून घेतलेले दोन वाटी ओले मटार घाला. मग या भाजीत चवीनुसार मीठ घालून भाजी व्यवस्थित ढवळून घ्या, म्हणजे भाजीत सर्वत्र हळद, मसाला आणि मीठ बरोबर लागेल.
५) मग पुन्हा कढईवर झाकण ठेवून मटार टोमॅटोची मसालेदार भाजी शिजण्यासाठी ठेवून द्या. दोन ते तीन मिनिटांनंतर काळजीपूर्वक झाकण उघडून बघा, भाजीला थोडे पाणी सुटले असेल, त्यामुळे भाजी चमचाने ढवळून पुन्हा सात ते आठ मिनिटे कढईवर झाकण ठेवून भाजी शिजण्यासाठी ठेवून द्या. आठ मिनिटांनंतर काळजीपूर्वक कढईवरील झाकण उघडून पाहिले तर भाजीतून खमंग सुवास येईल. मटार टोमॅटोची मसालेदार भाजी व्यवस्थित शिजली आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी भाजीतील मटार बोटाने चिलटून बघा, जर मटार सहज चिलटला गेला तर भाजी योग्य प्रकारे शिजली आहे, अशी खात्री करून घेता येईल. भाजी व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करा आणि मग भाजीवर बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घाला.
६) अशा पद्धतीने दहा ते पंधरा मिनिटांमध्ये स्वादिष्ट, चटपटीत आणि खमंग अशी मटार टोमॅटोची मसालेदार भाजी ही गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी तयार होईल.

चव :

रुचकर, चविष्ट आणि चमचमीत