मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी (बटाट्याची भाजी, बटाट्याची सुकी भाजी, बटाट्याची भाजी रेसिपी, उकडलेल्या बटाट्याची भाजी, उकडलेल्या बटाट्याची भाजी कशी बनवायची, उकडलेल्या बटाट्याची भाजी कशी करायची, उकडलेल्या बटाट्याची रेसिपी, उकडून बटाट्याची भाजी, उकडलेला बटाटा भाजी)

उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी

उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी (बटाट्याची भाजी, बटाट्याची सुकी भाजी, बटाट्याची भाजी रेसिपी, उकडलेल्या बटाट्याची भाजी, उकडलेल्या बटाट्याची भाजी कशी बनवायची, उकडलेल्या बटाट्याची भाजी कशी करायची, उकडलेल्या बटाट्याची रेसिपी, उकडून बटाट्याची भाजी, उकडलेला बटाटा भाजी)
उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी

Links To Read Blog On Ukadlelya Batatyanchi Piwali Bhaji In Other Languages :

Blog On Ukadlelya Batatyanchi Piwali Bhaji In English

पदार्थाविषयी माहिती :

उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी हा पदार्थ केवळ कोकण प्रांतात नव्हे तर अवघ्या महाराष्ट्र प्रांतात तसेच संपूर्ण भारतात फार प्रसिद्ध आहे आणि बहुतेक लोकांच्या आवडीचा पदार्थ आहे. कोकणात उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी हा पदार्थ विशेषतः गव्हाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या पुऱ्या किंवा चपात्या यांसोबत खाण्यासाठी अतिशय आवडीने बनवला जाणारा उत्कृष्ट पदार्थ आहे. उकडलेल्या बटाट्यांपासून बनवल्या जाणाऱ्या पिवळ्या भाजीचा वापर बऱ्याच पदार्थांमध्ये केला जातो, त्यामध्ये मुंबईत आणि अवघ्या जगात लोकप्रिय असणारा बटाटा वडा, कुर्मा पुरी, बटाट्यांचे पॅटीस, शेव पुरी, रगडा पॅटीस, आलू टिक्की, आलू पराठा इत्यादी पदार्थांचा समावेश आहे, या सर्व चटकदार आणि चटपटीत पदार्थांमध्ये उकडलेल्या बटाट्यांपासून बनवल्या जाणाऱ्या पिवळ्या भाजीचा वापर केला जातो. उकडलेल्या बटाट्यांच्या पिवळ्या भाजीची चव ही फार उत्कृष्ट असल्यामुळे बहुतेक लोक या भाजीचा गरमागरम पुरीसोबत किंवा चपतीसोबत आस्वाद घेतात. कोकणात देखील उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी हा पदार्थ खूप प्रसिद्ध असून नैवेद्यात, आवडीचा बेत म्हणून, तसेच पूरीसोबत किंवा चपातीसोबत खाण्यासाठी, गणपती उत्सवात भजन मंडळींसाठी खाशी बेत म्हणून देखील बटाट्यांची पिवळी भाजी आवडीने बनवली जाते.

विशेषता :

उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी या पदार्थाची विशेषता अशी आहे की ही भाजी उकडलेल्या बटाट्यांपासून बनवली जाते त्यामुळे ही फार त्वरित होणारी भाजी आहे. भाजी बनवण्यासाठी तेलात वापरला जाणारा कढीपत्ता, आले, लसूण, हिरव्या मिरच्या, हळद, मीठ अर्थात भाजीतील फोडणी हे या भाजीचे अत्यंत महत्वाचे वैशिष्य आहे, ज्यामुळे भाजीची चविष्टता अधिक वाढते. उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी ही कोकणात प्रसिद्ध असून आपण ही भाजी नाश्त्याला किंवा जेवणावर गरमागरम चपाती किंवा पुरी यासोबत खाण्यासाठी बनवू शकतो, याशिवाय जर बटाट्याच्या भाजीवर बारीक कापलेला कांदा घातला आणि त्यावर लिंबाचा रस पिळला तर भाजीची चव अधिकच उत्कृष्ट लागते.

साहित्य :

१) तेल
२) मोहरी
३) जिरे
४) आठ ते दहा कढीपत्त्याची पाने
५) बारीक कापून घेतलेला आल्याचा अर्धा तुकडा
६) बारीक कापून घेतलेल्या पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या
७) बारीक कापून घेतलेल्या सात ते आठ हिरव्या मिरच्या
८) हळद
९) मीठ
१०) दहा ते बारा बटाटी
११) पाणी
१२) कोथिंबीर

कृती :

१) उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा दहा ते बारा बटाटी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून बटाट्यांच्या सालीला असणारी माती निघून जाईल. नंतर या दहा ते बारा बटाट्यांचे दोन समान भाग करून घ्या आणि मग गॅस चालू करून त्यावर एका मोठ्या टोपात पाणी घेऊन त्या टोपात ही दोन भाग करून घेतलेली सर्व बटाटी घाला. मोठ्या आचेवर ही सर्व बटाटी व्यवस्थित उकडवण्यासाठी १५ मिनिटे ठेवून द्या. १५ मिनिटांनी टोपातील बटाटी शिजली आहेत की नाही याची खात्री करून घेण्यासाठी त्यात काट्याचा चमचा उभा खुपसून बघा. जर चमचा बटाट्यात गेला तर बटाटे व्यवस्थित शिजले आहे याची खात्री करून घेता येईल. मग गॅस बंद करा आणि या टोपातील गरम पाणी बटाट्यांमधून काळजीपूर्वक काढून टाका. ही सर्व बटाटी थंड झाल्यावर त्याची साल काढून घ्या. कारण थंड बटाट्यांच्या साली पटकन निघतात, त्यामुळे बटाट्यांची साल काढून घेण्याचे काम त्वरित होईल.
२) भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या ताटामध्ये उकडवून घेतलेल्या आणि साल काढून घेतलेल्या दहा ते बारा बटाट्यांच्या सुरीच्या मदतीने समान आकाराच्या फोडी करून घ्या. एकदा का उकडवून घेतलेल्या बटाट्यांच्या फोडी करून घेतल्या की उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी बनवण्याचे काम अगदी सोपे होऊन जाते.
३) त्यानंतर गॅस चालू करून त्यावर एक मोठी कढई ठेवा, कढई चांगली तापल्यानंतर त्यात दहा ते बारा चमचे तेल घाला, मग गॅस मंद आचेवर करून त्यात अर्धा चमचा मोहरी घाला, मोहरी तेलात व्यवस्थित तडतडल्यावर फोडणीत मोहरीचा खूप छान सुगंध दरवळेल, मग त्यात अर्धा चमचा जिरे आणि आठ ते दहा कढीपत्त्याची पाने घाला. फोडणीत मोहरी, जिरे आणि कढीपत्ता व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात लगेचच बारीक कापून घेतलेला आल्याचा अर्धा तुकडा, बारीक कापून घेतलेल्या पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या आणि बारीक कापून घेतलेल्या सात ते आठ हिरव्या मिरच्या घाला. तेलात ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घेतल्यावर फोडणीत आल्याचा आणि लसणीचा हलकासा सुगंध येईल आणि त्यातील मिरच्या भाजल्यानंतर फोडणीतून मिरच्यांचा तिखट स्वाद येईल.
४) यानंतर लगेचच या फोडणीत अर्धा चमचा हळद घाला आणि मोठ्या ताटामध्ये समान आकाराच्या फोडी करून घेतलेली उकडलेली बटाटी या फोडणीत घाला.
५) मग त्यात चवीनुसार मीठ घालून सर्व भाजी व्यवस्थित परतून घ्या म्हणजे सर्व फोडणी, हळद आणि मीठ हे बटाट्यांना व्यवस्थित लागेल. पुढे गॅस मध्यम आचेवर करून १० ते १५ मिनिटे बटाट्याची भाजी वाफेवर शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवा. कारण बटाट्याची भाजी वाफेवर शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही, जर गॅस मध्यम आचेवर करून भाजी शिजवली तर ती करपून जाण्याची शक्यता असते. यासाठी मंद आचेवर भाजी शिजण्यासाठी ठेवून द्या.
६) बटाटी उकडवून घेतल्यामुळे भाजी शिजवण्यासाठी त्यात अजिबात पाणी घालू नका, ही भाजी वाफेवर पटकन शिजते आणि वाफेवर शिजवल्यामुळे फोडणीतील सर्व जिन्नस आणि मीठ बटाटयाच्या भाजीला व्यवस्थित लागते. दहा ते पंधरा मिनिटांनंतर काळजीपूर्वक कढईवरील झाकण काढून बघा, भाजीतून खमंग सुवास येईल. भाजी व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करा आणि मग भाजीवर बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घाला.
७) अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये उकडलेल्या बटाट्यांची गरमागरम, हिरव्या मिरच्यांमुळे स्वादिष्ट आणि खमंग अशी उत्कृष्ट पिवळी भाजी गरमागरम चपातीसोबत किंवा पुऱ्यांसोबत झटपट खाण्यासाठी तयार होईल.

चव :

चवदार, खमंग आणि अप्रतिम स्वादाने परिपूर्ण