मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

तळलेली कुरकुरीत आणि मसालेदार कारली (कारली भाजी रेसिपी, कारली भाजी, कारल्याची भाजी, कारल्याची भाजी रेसिपी, कारले भाजी रेसिपी, कारले भाजी रेसिपी, कारले भाजी रेसिपी मराठी, कारले फ्राय, कारले फायदे)

तळलेली कुरकुरीत आणि मसालेदार कारली

तळलेली कुरकुरीत आणि मसालेदार कारली (कारली भाजी रेसिपी, कारली भाजी, कारल्याची भाजी, कारल्याची भाजी रेसिपी, कारले भाजी रेसिपी, कारले भाजी रेसिपी, कारले भाजी रेसिपी मराठी, कारले फ्राय, कारले फायदे)
तळलेली कुरकुरीत आणि मसालेदार कारली

Links To Read Blog On Talaleli Kurkurit Aani Masaledar Karali In Other Languages :

Blog On Talaleli Kurkurit Aani Masaledar Karali In English

पदार्थाविषयी माहिती :

तळलेली कुरकुरीत आणि मसालेदार कारली हा पदार्थ कोकण विभागात फार प्रसिद्ध असून हा पदार्थ विशेषकरून तांदळाच्या पिठापासून बनवली जाणारी भाकरी किंवा गव्हाच्या पिठापासून बनवली जाणारी चपाती यासोबत खाण्यासाठी बनवला जातो. तळलेली कुरकुरीत आणि मसालेदार कारली हा पदार्थ अतिशय सोपा, शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा पौष्टिक आणि चविष्ट असा पटकन होणारा पदार्थ आहे. कारल्याची भाजी ही जरी चवीला कडवट असली तरी देखील कारल्याच्या भाजीपासून बनवल्या जाणाऱ्या या अनोख्या पदार्थाची चव ही अतिशय उत्कृष्ट असते, त्यामुळे कोकणात हा पदार्थ नाश्त्याला किंवा जेवणात मोठ्या आवडीने बनवला जातो. याशिवाय कारल्याच्या भाजीचे फायदे देखील अनेक आहेत, कारल्याची भाजी खाल्ल्याने शरीरातील रक्त शुद्ध राहण्यास मदत होते, दमा आणि पोटदुखी या आजारांवर कारल्याची भाजी हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. कारल्याची भाजी चवीला अत्यंत कडू असते आणि त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी कारल्याच्या भाजीचे नियमित सेवन हे खूप फायदेशीर ठरते. कारल्याच्या भाजीचे सेवन केल्यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. ज्यांना कफाचा त्रास होतो, त्यांच्यासाठी कारल्याची भाजी ही खूप फायदेशीर आहे. कारल्याच्या भाजीत तंतुमय पदार्थांचे प्रमाण हे जास्त असते, त्यामुळे कारल्याची भाजी खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते. कारल्याच्या भाजीत अँटीऑक्सिडेंट्स कर्करोग होण्यापासून रक्षण करतात. कारल्याच्या भाजीचे हे सर्व गुणकारी फायदे असल्यामुळे सर्वांनी कारल्याच्या भाजीचा आहारात समावेश केला पाहिजे. ज्यांना कारल्याची भाजी खाण्यासाठी आवडत नाही त्यांच्यासाठी तळलेली कुरकुरीत आणि मसालेदार कारली हा कोकणात विशेष प्रसिद्ध असणारा पदार्थ एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

विशेषता :

तळलेली कुरकुरीत आणि मसालेदार कारली या पदार्थाची विशेषता अशी आहे की हा पदार्थ कोकणात भाकरी किंवा चापतीसोबत खाण्यासाठी मोठ्या आवडीने बनवला जातो. शिवाय हा पटकन होणारा पदार्थ असल्यामुळे भात आणि डाळ यासोबत भाजी बनवण्याचा वेळ देखील वाचतो. या पदार्थाचे अत्यंत महत्वाचे वैशिष्ट्य हे असे की या पदार्थाची चव जरी कडू असली तरीही या पदार्थातील हळद, मसाला आणि मीठ हे पदार्थाची चव अधिक वाढवतात, तसेच गा तेलात तळून बनवला जाणारा पदार्थ असल्यामुळे तो अधिक कुरकुरीत बनतो. कारल्याचे नाव जरी घेतले तरी बहुतेक सर्वच जण नाक मुरडतात, परंतु कारल्याच्या भाजीचे गुणधर्म आणि औषधी फायदे हे भाजीचे मुख्य वैशिष्ट्य आहे, त्यामुळे सर्वांनी कारल्याची भाजी आणि त्यापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांचा जेवणात समावेश केला पाहिजे. 

साहित्य :

१) तेल
२) सात ते आठ कारली
३) हळद
४) मसाला
५) मीठ

कृती :

१) तळलेली कुरकुरीत आणि मसालेदार कारली हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वप्रथम सात ते आठ कारली पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरुन कारल्याच्या भाजीवरील माती निघून जाईल. मग विळीवर किंवा सुरीच्या मदतीने कारल्याच्या भाजीचे दोन उभे भाग करून घ्या. कारल्याच्या भाजीमध्ये सफेद रंगाच्या लहान बिया असतात, त्या सर्व बिया चमचाच्या किंवा सोलण्याच्या साहाय्याने काढून घ्या. अशा पद्धतीने कारल्याची भाजी व्यवस्थित साफ करून घेतल्यावर कारल्याच्या भाजीचे विळीवर किंवा सुरीच्या मदतीने एका मोठ्या पसरट ताटामध्ये बारीक उभे काप कापून घ्या.
२) त्यानंतर एक मोठा टोप घ्या, त्या टोपात हे कारल्याचे सर्व काप व्यवस्थित बुडतील एवढे पाणी घ्या. कारल्याचे हे सर्व काप ८ ते १० मिनिटे टोपातील पाण्यात भिजत ठेवा, जेणेकरून कारल्याचे काप पाण्यात कडक होऊन ते तळल्यावर आणखी कुरकुरीत लागतील.
३) दहा मिनिटांनंतर टोपात भिजत ठेवलेल्या कारल्याच्या कापांमधील पाणी काढून टाका, मग या कारल्याच्या कापांमध्ये चिमूटभर हळद, तिखट चवीसाठी एक चमचा मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. नंतर कारल्याच्या कापांना हे सर्व जिन्नस सर्वत्र लागण्यासाठी हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्या.
४) नंतर गॅस चालू करून त्यावर एक मोठी कढई ठेवा आणि हळद, मसाला व मीठ लावून घेतलेले कारल्याचे काप तळून घेण्यासाठी कढईमध्ये अंदाजाने तेल ओता. गॅस मध्यम आचेवर करून तेल तापण्यासाठी ठेवून द्या, तेल व्यवस्थित तापल्यावर गॅस मंद आचेवर करून घ्या आणि हे सर्व कारल्याचे काप काळजीपूर्वक तेलात खरपूस लालसर होईपर्यंत चांगले तळून घ्या. गॅस मोठ्या किंवा मध्यम आचेवर केल्याने कारल्याचे काप करपून जाण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस मंद आचेवर करून कारल्याचे काप तळून घ्या.
५) कारल्याचे काप लालसर झाल्यानंतर कारल्याचा खमंग सुवास येईल आणि कारली तेलात चांगली तळल्यावर त्यातील तेल व्यवस्थित गाळून झाऱ्याच्या मदतीने हे सर्व कारल्याचे काप एका ताटात अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने काढून घ्या आणि मग गॅस बंद करा.
६) अशा पद्धतीने २० ते २५ मिनिटांध्ये खमंग, गरमागरम, मसालेदार आणि कुरकुरीत असे कारल्याचे काप हे भात, डाळ किंवा चपाती, भाकरी यसोबत खाण्यासाठी तयार होतील.

चव :

कडू पण चविष्ट आणि कुरकुरीत