मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

उकडलेल्या बटाट्यांची मसालेदार भाजी (बटाट्याची भाजी, बटाट्याची सुकी भाजी, बटाट्याची भाजी रेसिपी, उकडलेल्या बटाट्याची भाजी, उकडलेल्या बटाट्याची भाजी कशी बनवायची, उकडलेल्या बटाट्याची भाजी कशी करायची, उकडलेल्या बटाट्याची रेसिपी, उकडून बटाट्याची भाजी, उकडलेला बटाटा भाजी)

उकडलेल्या बटाट्यांची मसालेदार भाजी

उकडलेल्या बटाट्यांची मसालेदार भाजी (बटाट्याची भाजी, बटाट्याची सुकी भाजी, बटाट्याची भाजी रेसिपी, उकडलेल्या बटाट्याची भाजी, उकडलेल्या बटाट्याची भाजी कशी बनवायची, उकडलेल्या बटाट्याची भाजी कशी करायची, उकडलेल्या बटाट्याची रेसिपी, उकडून बटाट्याची भाजी, उकडलेला बटाटा भाजी)
उकडलेल्या बटाट्यांची मसालेदार भाजी

Links To Read Blog In Other Languages On Ukadlelya Batatyanchi Masaledar Bhaji :

Blog On Ukadlelya Batatyanchi Masaledar Bhaji In English

पदार्थाविषयी माहिती :

कोकण प्रांतात बटाट्याची भाजी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की काही जणांना बटाट्याची मिरची घालून बनवलेली भाजी खायला आवडते तर बहुतेक जणांना बटाट्याची मसाला घालून बनवलेली तिखट आणि मसालेदार अशी चटपटीत भाजी खायला आवडते. मात्र कोकणात बटाट्याची भाजी बनवण्याच्या पद्धती या निरनिराळ्या आहेत. सर्वांनाच ओळखीची असलेली एक पद्धत म्हणजे बटाटा वडा बनवण्यासाठी आवश्यक असणारी उकडून घेतलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी, दुसरी पद्धत म्हणजे बटाट्याचे काप करून केलेली मसालेदार भाजी, तिसरी पद्धत म्हणजे बटाट्याची वाफेवर शिजवून बनवली जाणारी पिवळी भाजी या आणि अशा बऱ्याच प्रकारे बटाट्याची भाजी बनवली जाते. शिवाय बहुतेक जण आपापल्या आवडणीनुसार बटाट्याची चविष्ट भाजी बनवतात. कोकणात बटाट्याची भाजी बनवण्याची आणखी एक पद्धत म्हणजे उकडलेल्या बटाट्यांची मसालेदार भाजी ही आहे. ही भाजी बनवताना तिखट स्वादासाठी यात हिरव्या मिरच्यांऐवजी मसाल्याचा वापर केला जातो, त्यामुळे भाजीला मसाल्याचा तिखट स्वाद येऊन भाजी आणखी चविष्ट बनते. कोकण विभागात उकडलेल्या बटाट्यांची मसालेदार भाजी हा पदार्थ बनवण्यासाठी छोट्या आकाराच्या बटाट्यांचा विशेष वापर केला जातो, कारण आकाराने लहान असणारी बटाटी पाण्यात लवकर उकडतात, तसेच भाजीतील फोडणी, मसाला, मीठ हे सर्व जिन्नस बटाटी उकडून घेतल्यामुळे त्याला व्यवस्थित लागते. उकडलेल्या बटाट्यांची मसालेदार भाजी हा पदार्थ कोकणात खास प्रसिद्ध असून गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत या भाजीचा आस्वाद घेता येऊ शकतो.

विशेषता :

उकडलेल्या बटाट्यांची मसालेदार भाजी या पदार्थाची मुख्य विशेषता अशी आहे की ही भाजी बनवण्यासाठी आधी लहान आकाराची बटाटी पाण्यात उकडवून घेतली जातात आणि उकडलेल्या बटाट्यांचा वापर केल्यामुळे भाजीची चव वाढून भाजी आणखी स्वादिष्ट बनते. एकदा का बटाटी उकडवून घेतली की उकडलेल्या बटाट्यांची मसालेदार भाजी बनवण्याचे काम अधिक सोपे होऊन जाते. या भाजीची अन्य विशेषता अशी आहे की बटाट्याची भाजी बनवण्यासाठी नेहमी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या बटाट्यांपेक्षा लहान आकारांच्या बटाट्यांचा उपयोग केला जातो, ज्यांची चव फार उत्कृष्ट लागते. भाजीत वापरला जाणारा मसाला भाजीची लज्जत वाढवतो आणि ज्यांना तिखट, मसालेदार भाजी खाण्यासाठी विशेष आवडते त्यांच्यासाठी उकडलेल्या बटाट्यांची मसालेदार भाजी आणि तांदळाच्या पिठापासून बनवलेली गरमागरम भाकरी हा जेवणाचा उत्तम बेत ठरू शकतो.

साहित्य :

१) तेल
२) मोहरी
३) जिरे
४) आठ ते दहा कढीपत्त्याची पाने
५) एक बारीक चिरलेला कांदा
६) हळद
७) मसाला
८) मीठ
९) लहान आकाराची दहा ते बारा बटाटी
१०) पाणी
११) कोथिंबीर

कृती :

१) उकडलेल्या बटाट्यांची मसालेदार भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा लहान आकाराची दहा ते बारा बटाटी स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून बटाट्यांच्या सालीला असणारी माती निघून जाईल. नंतर गॅस चालू करून त्यावर एक मोठा टोप ठेवा. त्या टोपात दहा ते बारा बटाटी सहज बुडतील एवढे पाणी घाला. मग या टोपात ही धुवून घेतलेली दहा ते बारा बटाटी घाला. मोठ्या आचेवर ही सर्व बटाटी १५ मिनिटे व्यवस्थित उकडवण्यासाठी ठेवून द्या. १५ मिनिटांनी टोपातील बटाटी शिजली आहेत की नाही याची खात्री करून घेण्यासाठी त्यात काट्याचा चमचा उभा खुपसून बघा. जर चमचा बटाट्यात गेला तर बटाटे व्यवस्थित शिजले आहे याची खात्री करून घेता येईल. मग गॅस बंद करा आणि या टोपातील गरम पाणी बटाट्यांमधून काळजीपूर्वक काढून टाका. ही सर्व बटाटी थंड झाल्यावर त्याची साल काढून घ्या. कारण थंड झालेल्या बटाट्यांच्या साली पटकन निघतात, त्यामुळे बटाट्यांची साल काढून घेण्याचे काम त्वरित होईल.
२) एकदा का बटाटी उकडवून घेतली की उकडलेल्या बटाट्यांची मसालेदार भाजी बनवण्याचे काम अगदी सोपे होऊन जाते.
३) त्यानंतर गॅस चालू करून त्यावर एक मोठी कढई ठेवा, कढई चांगली तापल्यानंतर त्यात दहा ते बारा चमचे तेल घाला, मग गॅस मंद आचेवर करून त्यात अर्धा चमचा मोहरी घाला, मोहरी तेलात व्यवस्थित तडतडल्यावर फोडणीत मोहरीचा खूप छान सुगंध दरवळेल, मग त्यात अर्धा चमचा जिरे आणि आठ ते दहा कढीपत्त्याची पाने घाला. फोडणीत मोहरी, जिरे, कढीपत्ता व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात लगेचच एक बारीक चिरलेला कांदा घाला.
४) कढईतील ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घ्या, तेलात कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या. कांदा लालसर होईस्तोवर दुसऱ्या बाजूला उकडवून घेतलेल्या आणि साल काढून घेतलेल्या लहान आकाराच्या बटाट्यांचे दोन समान भाग करून घ्या. 
५) कांदा तेलात लालसर झाल्यानंतर त्यात चिमूटभर हळद, एक चमचा मसाला घाला. (नोंद : ज्यांना जास्त तिखट आणि मसालेदार पदार्थ खायला आवडतात, त्यांच्यासाठी आवडीनुसार तिखटासाठी भाजीतील फोडणीत आणखी मसाला घालता येऊ शकतो. ) यानंतर लगेचच टोपातील दोन भाग करून घेतलेली उकडलेली बटाटी या फोडणीत घाला.
६) मग त्यात चवीनुसार मीठ घालून सर्व भाजी व्यवस्थित परतून घ्या म्हणजे सर्व फोडणी, मसाला सर्वत्र बटाट्यांना व्यवस्थित लागेल. पुढे गॅस मंद आचेवर करून १० ते १५ मिनिटे बटाट्याची भाजी वाफेवर शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवा, कारण बटाट्याची मसालेदार भाजी वाफेवर शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही, जर गॅस मध्यम आचेवर करून भाजी शिजवली तर ती करपून जाण्याची शक्यता असते. यासाठी मंद आचेवर भाजी शिजण्यासाठी ठेवून द्या.
७) बटाटी उकडवून घेतल्यामुळे भाजी शिजवण्यासाठी त्यात अजिबात पाणी घालू नका, ही भाजी वाफेवर पटकन शिजते आणि भाजी वाफेवर शिजवल्यामुळे फोडणीतील सर्व जिन्नस आणि मीठ बटाटयाच्या भाजीला व्यवस्थित लागते. दहा ते पंधरा मिनिटांनंतर काळजीपूर्वक कढईवरील झाकण काढून बघा, भाजीतून खमंग सुवास येईल. भाजी व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करा आणि मग भाजीवर बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घाला.
८) अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये उकडलेल्या बटाट्यांची गरमागरम, मसालेदार आणि रुचकर अशी स्वादिष्ट भाजी भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी तयार होईल.

चव :

स्वादिष्ट, मसालेदार आणि चमचमीत