मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

तूरीच्या डाळीपासून बनवलेली गोडी डाळ (तूर डाळ, तुरीची डाळ, तुरीची डाळ कशी बनवायची, तुरीची डाळ खाण्याचे फायदे, तुरीची डाळ कशी बनवतात, तुरीची डाळ कशी करावी, तुरीची डाळ कशी बनवावी, तुरीची डाळ बनवण्याची पद्धत, तुरीची डाळ कसे बनवतात, गोडी डाळ कशी बनवायची, गोडी डाळ रेसिपी, डाळ फ्राय रेसिपी, डाळ फ्राय कशी बनवायची, डाळ फ्राय रेसिपी इन मराठी, डाळ फ्राय ची रेसिपी, डाळ फ्राय कशी करायची, डाळ फ्राय बनवण्याची रेसिपी)

तूरीच्या डाळीपासून बनवलेली गोडी डाळ

तूरीच्या डाळीपासून बनवलेली गोडी डाळ (तूर डाळ, तुरीची डाळ, तुरीची डाळ कशी बनवायची, तुरीची डाळ खाण्याचे फायदे, तुरीची डाळ कशी बनवतात, तुरीची डाळ कशी करावी, तुरीची डाळ कशी बनवावी, तुरीची डाळ बनवण्याची पद्धत, तुरीची डाळ कसे बनवतात, गोडी डाळ कशी बनवायची, गोडी डाळ रेसिपी, डाळ फ्राय रेसिपी, डाळ फ्राय कशी बनवायची, डाळ फ्राय रेसिपी इन मराठी, डाळ फ्राय ची रेसिपी, डाळ फ्राय कशी करायची, डाळ फ्राय बनवण्याची रेसिपी)
तुरीच्या डाळीपासून बनवलेली गोडी डाळ

Links To Read Blog In Other Languages On Turichya Dalipasun Banavleli Godi Dal :

Blog On Turichya Dalipasun Banavleli Godi Dal In English

पदार्थाविषयी माहिती :

तूरीच्या डाळीपासून बनवलेली गोडी डाळ या पदार्थाच्या नावावरून आपणास असे लक्षात येईल की हा पदार्थ चवीला अजिबातच मसालेदार नसावा. याचा अर्थ असा नव्हे की गोडी डाळ ही चवीला गोड असावी, कोकणात गोडी डाळ याकरीता म्हटले जाते कारण ही डाळ अजिबातच मसाला न वापरता बनवली जाते म्हणजेच ती मसाल्यामुळे तिखट नसून गोडी डाळ असते. ज्यांना भातासोबत खाण्यासाठी तिखट वरण, डाळ आवडत नसेल त्यांच्यासाठी तूरीच्या डाळीपासून बनवलेली गोडी डाळ हा जेवणाचा उत्तम बेत ठरू शकतो. तूरीच्या डाळीत भरपूर प्रमाणात प्रथिने, कर्बोदके आणि तंतुमय पदार्थ असतात, त्यामुळे शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी तूरीच्या डाळीचा आहारात समावेश करणे हे फार महत्वाचे आहे. म्हणूनच भारतात तूर डाळ हे भारतीयांच्या आहारातील अतिशय महत्वाचे धान्य मानले जाते. तूरीची डाळ ही चवीला उग्र असल्यामुळे डाळीचा उग्रपणा कमी करण्यासाठी त्यात टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि लसूण यांचा योग्य प्रमाणात वापर केला जातो. कोकणात तूरीच्या डाळीचे गोडे, तिखट असे वरण गरमागरम भातासोबत खाण्यासाठी बनवले जाते, त्यामुळे तूरीची डाळ ही कोकण विभागात फार प्रसिद्ध आहे.

विशेषता :

तूरीच्या डाळीपासून बनवलेल्या गोडी डाळीची विशेषता अशी की या डाळीत मोहरी, कढीपत्ता, जिरे, लसूण, आले, हिंग आणि हळद यांचा फोडणीसाठी वापर केल्यामुळे या सर्व जिन्नसांचा एकत्रितपणे डाळीला फार उत्कृष्ट स्वाद आणि सुगंध येतो. तूरीच्या डाळीत टोमॅटो वापरल्यामुळे तूरीच्या डाळीची उग्रता निघून जाते आणि डाळीला किंचित आंबट चव येऊन डाळ आणखी स्वादिष्ट बनते. तूरीची गोडी डाळ ही बनवण्यासाठी अत्यंत सोपी असून यात मसाल्याऐवजी हिरव्या मिरचीचा वापर केला जातो, त्यामुळे तूरीची डाळ ही मध्यम स्वरूपात तिखट बनते आणि ज्यांना तिखट डाळ आवडत नाही त्यांच्यासाठी मध्यम स्वरूपाची तिखट असलेली तूरीच्या डाळीपासून बनवलेली गोडी डाळ हा डाळीचा उत्तम पर्याय ठरू शकतो.

साहित्य :

१) तेल
२) मोहरी
३) सात ते आठ कढीपत्त्याची पाने
४) जिरे
५) दोन ते तीन भाग करून घेतलेल्या चार हिरव्या मिरच्या
६) बारीक कापून घेतलेल्या पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या
७) बारीक कापून घेतलेला आल्याचा अर्धा तुकडा
८) हिंग
९) हळद
१०) दोन बारीक चिरलेले कांदे
११) दोन बारीक चिरलेले टोमॅटो
१२) मीठ
१३) दोन वाटी तूरीची डाळ
१४) पाणी
१५) कोथिंबीर

कृती :

१) तूरीच्या डाळीपासून गोडी डाळ बनवण्यासाठी पहिल्यांदा दोन वाटी तूरीची डाळ पाण्याने तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर एका कूकर मध्ये ही धुवून घेतलेली तूरीची डाळ घ्या, या डाळीत दोन ते तीन भाग करून घेतलेल्या चार हिरव्या मिरच्या घाला आणि दोन बारीक चिरलेले टोमॅटो घाला. दोन वाटी डाळ घेतल्यामुळे ही डाळ शिजवण्यासाठी कूकर मध्ये अडीज ग्लास पाणी घाला. तूरीची डाळ चवीला उग्रट असल्यामुळे डाळ शिजवताना त्यात टोमॅटो आणि मिरची घातली जाते, त्यामुळे डाळीचा उग्रपणा कमी होऊन डाळीला किंचित आंबट आणि मिरचीमुळे तिखट स्वाद येतो. मग कूकरचे झाकण लावून गॅस चालू करून त्यावर कूकर ठेवा आणि तूरीची डाळ शिजवण्यासाठी कूकरच्या चार शिट्या काढून घ्या.
२) कूकरच्या चार शिट्या काढून घेतल्यानंतर गॅस बंद करा आणि मग पाच ते सात मिनिटांनी कूकरची शिटी चमचाच्या साहाय्याने वर करून त्यातील वाफ काढून घ्या आणि वाफ निघाल्यानंतर कूकरचे झाकण उघडा.
३) अशा पद्धतीने तूरीची डाळ व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस चालू करून त्यावर एक मोठा टोप ठेवा, टोप व्यवस्थित तापल्यानंतर त्यात सात ते आठ चमचे तेल घाला, अर्धा चमचा मोहरी घाला. तेलात मोहरी व्यवस्थित तडतडल्यावर गॅस मंद आचेवर करून त्यात सात ते आठ कढीपत्त्याची पाने, अर्धा चमचे जिरे, चिमुटभर हिंग घाला. फोडणीत मोहरी, कढीपत्ता, जिरे आणि हिंग यांचा सुगंध येताच त्यात बारीक कापून घेतलेल्या पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या आणि बारीक कापून घेतलेले आले घाला. ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घ्या.
४) त्यानंतर या फोडणीत दोन बारीक चिरलेले कांदे घाला, कांदा तेलात लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या.
५) कांदा लालसर झाल्यानंतर फोडणीत अर्धा चमचा हळद घाला. कोकण विभागात तूरीची गोडी डाळ बनवण्यासाठी हळद हे तूरीच्या डाळीतील अत्यंत महत्वाचे जिन्नस आहे, कारण गोड्या डाळीला पिवळसर रंग येण्यासाठी त्यात हळद घातली जाते. डाळीत हळद घातल्यामुळे तूरीच्या डाळीला हळदीचा सुंदर स्वाद आणि हलका पिवळसर रंग येतो.
६) त्यानंतर या टोपातील फोडणीत कूकर मध्ये शिजवून घेतलेली तूरीची डाळ घाला, नंतर त्यात चवीनुसार मीठ घाला आणि तूरीची डाळ फार घट्ट आणि जास्त पातळ होऊ नये यासाठी आवश्यकतेनुसार तूरीच्या डाळीत पाणी घाला. यानुसार तूरीची डाळ व्यवस्थित ढवळून घ्या, जेणेकरुन डाळीत सर्व फोडणी आणि मीठ सर्वत्र बरोबर लागेल.
७) मग गॅस किंचित वाढवून घ्या आणि तूरीच्या डाळीत चमचा उलटा करून घालून ठेवा. (नोंद : डाळीत चमचा उलटा करून ठेवल्याने डाळीला उकळी आल्यावर डाळ ओतू जाणार नाही. ) अशा तऱ्हेने तूरीची डाळ पाच ते दहा मिनिटे उकळी येण्यासाठी ठेवून द्या. तूरीच्या डाळीला उकळी येण्यास सुरुवात होऊन तूरीच्या डाळीचा सुगंध दरवळेल. एकदा का तूरीच्या डाळीला व्यवस्थित उकळी येऊन डाळ शिजली की काळजीपूर्वक डाळीतील चमचा रुमालाच्या साहाय्याने बाहेर काढून गॅस बंद करा आणि मग डाळीवर बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घाला.
८) यानुसार तूरीची गरमागरम, स्वादिष्ट आणि पौष्टिक गोडी डाळ मऊ आणि लुसलुशीत भातासोबत खाण्यासाठी तयार होईल.

चव :

चविष्ट आणि पौष्टिक