मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

लालमाठची भाजी (लालमाठ भाजी, लाल माठ भाजी, लाल माठ भाजी रेसिपी, लाल माठ भाजी फायदे, लाल माठ रेसिपी, लाल माठ पालेभाजी, लाल माठ recipe, लाल माथी in marathi)

लालमाठची भाजी

लालमाठची भाजी (लालमाठ भाजी, लाल माठ भाजी,  लाल माठ भाजी रेसिपी, लाल माठ भाजी फायदे, लाल माठ रेसिपी, लाल माठ पालेभाजी, लाल माठ recipe, लाल माथी in marathi)
लालमाठची भाजी (ओल्या खोबऱ्याशिवाय)

लालमाठची भाजी (लालमाठ भाजी, लाल माठ भाजी,  लाल माठ भाजी रेसिपी, लाल माठ भाजी फायदे, लाल माठ रेसिपी, लाल माठ पालेभाजी, लाल माठ recipe, लाल माथी in marathi)
लालमाठची भाजी (ओल्या खोबऱ्यासहित)

Links To Read Blog In Other Languages On Lalmathachi Bhaji  :

Blog On Lalmathachi Bhaji In English

पदार्थाविषयी माहिती :

लालमाठची भाजी हा अत्यंत पौष्टिक आणि शरीराचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत करणारा पदार्थ आहे. लालमाठची भाजी ही तांदळाच्या किंवा नाचणीच्या किंवा ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी फार रुचकर लागते. लालमठची भाजी ही लालमाठच्या पालेभाजी पासून बनवली जाते आणि ही भाजी बनवण्यासाठी अतिशय सोपी आहे. कोकण विभागात भाकरीसोबत मुळा, मेथी इत्यादी पालेभाज्यांबरोबर कोकणात लालमाठ ही भाजी देखील बनवली जाते. लालमाठच्या भाजीचे स्वरूप हे लाल रंगाचे असते, या भाजीच्या नावात माठ असे जरी असले तरी देखील लालमाठच्या भाजीचे अनेक गुणधर्म आहेत त्यामुळे लालमाठची भाजी ही आठवड्यातून एकदा तरी आवर्जून खाल्ली पाहिजे.

विशेषता :

लालमाठची भाजी ही लालमाठ या पालेभाजीपासून बनवली जाते, लालमाठच्या भाजीचे बरेच फायदे आहेत, लालमाठच्या भाजीत तंतुमय पदार्थ असल्यामुळे बद्धकोष्टतेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, या भाजीत क आणि ई हे जीवनसत्त्व असल्यामुळे त्वचेशी संबंधित सर्व समस्यांशी लढण्यासाठी मदत होते तसेच या भाजीत अ जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. लालमाठची भाजी ही लाल रंगाची असल्यामूळे यात लोहाचे प्रमाण हे अधिक असते म्हणून शरीरातील रक्ताची उणीव भरून निघते आणि रक्तातून प्राणवायू वाहून नेणाऱ्या रक्तातील हिमग्लोबिनचे प्रमाण वाढवते. याशिवाय लालमाठच्या भाजीत कॅल्शियम असल्यामुळे ही भाजी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. लालमाठच्या भाजीचा अत्यंत महत्वाचा गुणधर्म असा आहे की या भाजीत फाईटो स्टेरॉल असल्यामुळे रक्तातील कॉलेस्टेरॉल नियंत्रित करते आणि भाजीतील पोटॅशियम ह्रदयाची गतीचे नियमन करण्यास मदत करते. लालमाठच्या भाजीचे हे सर्व आरोग्यदायी फायदे आणि गुणधर्म हीच लालमाठच्या भाजीची प्रमुख विशेषता आहे. त्यामुळे घरोघरी लालमाठच्या भाजीसारख्या खूप फायदेशीर आणि कोकणात भाकरीसोबत खाण्यासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या पौष्टिक भाजीचा आहारात समावेश करून घेणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे.

साहित्य :

१) तेल
२) सात ते आठ कढीपत्त्याची पाने
३) दोन बारीक चिरलेले कांदे
४) दोन चार ते पाच हिरव्या मिरच्या तीन भाग करून घेतलेल्या
५) दोन जुड्या लालमाठची भाजी
६) पाणी
७) मीठ
८) एक वाटी ओले खोबरे

कृती :

१) लालमाठची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम दोन जुड्या लालमाठची पालेभाजी घ्या. त्यानंतर या दोन्ही लालमाठच्या जुड्या व्यवस्थित साफ करून घेण्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये लालमाठच्या भाजीची पाने काढून घ्या.
२) लालमाठच्या भाजीची लाल पाने पाण्यात स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून त्यातील माती निघून जाईल.
३) त्यानंतर या लालमाठच्या भाजीची लाल पाने विळीच्या किंवा सुरीच्या साहाय्याने बारीक चिरून घ्या.
४) अशा पद्धतीने एकदा लालमाठची भाजी बारीक चिरून घेतल्यानंतर नंतर गॅस चालू करून त्यावर एक मोठी कढई ठेवा. कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल घाला. तेल चांगले तापल्यानंतर त्यात दोन ते तीन भाग करून घेतलेल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ कढीपत्त्याची पाने घाला. तेलात घातलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता करपू नये म्हणून गॅस थोडा कमी करा. मिरच्या व्यवस्थित भाजल्यानंतर आणि कढीपत्त्याचा सुगंध आल्यानंतर त्यात दोन बारीक चिरलेले कांदे घाला. ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घ्या. कांदा लालसर होईपर्यंत तेलात व्यवस्थित भाजून घ्या.
५) कांदा तेलात लालसर झाल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली लालमाठची भाजी घाला. भाजी घालताना त्यात पाणी असणार नाही याची विशेष काळजी घ्या, कारण पालेभाजी ही वाफेवर योग्य पद्धतीने शिजते. मग भाजीमध्ये चवीनुसार मीठ घाला आणि भाजी व्यवस्थित ढवळून घ्या, जेणेकरून भाजीत सर्वत्र मीठ अगदी बरोबर लागेल.
६) त्यानंतर गॅस मंद आचेवरच ठेवून कढईच्या तोंडावर झाकण ठेवून लालमाठची भाजी वाफेवर दहा ते पंधरा मिनिटे शिजवून घ्या. लालमाठची भाजी शिजण्यासाठी ठेवल्यावर तिला आपोआपच पाणी सुटेल आणि वाफेवर ती अगदी योग्य प्रकारे शिजेल, त्यामुळे ती शिजवण्यासाठी त्यात अजिबात पाणी घालू नका. लालमाठची भाजी शिजताना त्यात चरचर असा आवाज देखील होईल, त्यावरून आपणांस हे लक्षात येईल की लालमाठची भाजी अजूनही शिजत आहे.   
७) लालमाठची भाजी बनवताना ती पटकन होण्यासाठी आपण गॅस किंचित वाढवू शकतो, परंतु ती करपून जाण्याची शक्यता जास्त असते. कारण सर्व गृहिणींना हे ठाऊकच असेल की वाफेवर कोणतीही भाजी अगदी पटकन शिजते. लालमाठची भाजी नीट चरचरली की त्यातील पाणी निघून जाते, त्यामुळे एकदा भाजी शिजली की त्यातून भाजी चरचरण्याचा आवाज येणार नाही.    
८) लालमाठच्या भाजीचा दोन प्रकारे आस्वाद घेता येऊ शकतो, एक म्हणजे कोकण विभागात बनवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये ओल्या खोबऱ्याचा समावेश अधिक प्रमाणात असतो त्यामुळे कोकणात लालमाठच्या भाजीमध्ये कातलेले ओले खोबरे घातले जाते आणि ओल्या खोबऱ्यामुळे भाजीची चव आणखीन उत्कृष्ट लागते, म्हणून लालमाठच्या भाजी अधिक चविष्ट बनवण्यासाठी त्यात ओले खोबरे घालता येईल आणि दुसरे म्हणजे लालमाठची भाजी ही ओल्या खोबऱ्याशिवाय देखील अतिशय चवदार लागते, त्यामुळे लालमाठची भाजी व्यवस्थित शिजल्यानंतर तिचा गरमागरम भाकरीसोबत आस्वाद घेता येऊ शकतो. जेवणात ओल्या खोबऱ्याचा समावेश असणे ही कोकणाची खासियत आहे, त्यामुळे लालमाठची भाजी शिजल्यानंतर त्यात वरून बारीक कातलेले एक वाटी ओले खोबरे घाला आणि लालमाठची भाजी व्यवस्थित ढवळून गॅस बंद करून घ्या. अशा प्रकारे शरीरासाठी पौष्टिक अशी लालमाठची भाजी गरमागरम भाकरीसोबत खाण्यास तयार होईल. लालमाठच्या भाजीसोबत जर ज्वारी किंवा बाजरीच्या पिठापासून बनवलेली भाकरी खाल्ली तर हा शरीर स्वास्थ्यासाठी लाभदायी बेत ठरू शकतो.

चव :

अप्रतिम आणि रुचकर