मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

बटाट्याचा कीस (बटाट्याचा कीस, बटाट्याची कीस रेसिपी, बटाट्याचा कीस करण्याची पद्धत, बटाट्याचा कीस कसा बनवायचा, बटाट्याचा कीस कसा बनवतात, उपवासाचे पदार्थ मराठी रेसिपी, उपवासाचे पदार्थ फोटो)

बटाट्याचा कीस 

बटाट्याचा कीस (बटाट्याचा कीस, बटाट्याची कीस रेसिपी, बटाट्याचा कीस करण्याची पद्धत, बटाट्याचा कीस कसा बनवायचा, बटाट्याचा कीस कसा बनवतात, उपवासाचे पदार्थ मराठी रेसिपी, उपवासाचे पदार्थ फोटो)
बटाट्याचा कीस

Links To Read Blog In Other Languages On Batatyacha Kis :

Blog On Batatyacha Kis In English

पदार्थाविषयी माहिती : 

बटाट्याचा कीस या पदार्थावरून आपल्या हे सहजपणे लक्षात येईल की हा पदार्थ बटाटा भाजीपासून बनवला जातो. बटाट्याचा कीस हा उपवासाचा पदार्थ असून कोकणात ग्रामीण भागात साबुदाण्याची खिचडी तसेच बटाट्याचा कीस हा पदार्थ देखील उपवासाच्या दिवशी घराघरात बनवला जातो. उपवासाच्या दिवशी बहुतेक जण फळांचा आहार घेतात, तर काही जण साबुदाण्याच्या खिचडीचा आस्वाद घेतात, काही जणांना साबुदाण्याची खिचडी हा पदार्थ उपवासाच्या दिवशी खाऊन कंटाळा येतो म्हणून साबुदाण्याच्या खिचडी ऐवजी बटाट्याचा कीस हा पदार्थ थोडा वेगळा पण अत्यंत चविष्ट आणि फार कमी साहित्याचा वापर करून बनवायला अतिशय सोपा असा उपवासाचा उत्तम बेत ठरू शकतो. बटाटा भाजी ही बहुतेक लोकांना आवडते कारण इतर भाज्यांपेक्षा बटाटा भाजीची चव वेगळी असून बटाटा वापरून वेगवेगळया पद्धतीने पदार्थ देखील बनवता येतात आणि बरेच लोक बटाट्याचे पदार्थ खूप आवडीने खातात. जर गृहिणींना उपवासाच्या दिवशी उपवासाचा पदार्थ बनवायचा असेल आणि साबुदाण्याची खिचडी बनविण्यासाठी साबुदाणा उपलब्ध नसेल किंवा पदार्थ बनवण्यासाठी वेळेची कमतरता असेल तर बटाट्याचा कीस हा पदार्थ फार त्वरित होणारा उपवासाचा पदार्थ आहे.

विशेषता : 

बटाट्याचा कीस हा उपवासाचा पदार्थ असून फार पटकन होणारा पदार्थ आहे आणि हा पदार्थ बनवण्यासाठी फार जास्त साहित्याची आवश्यकता लागत नाही, घरच्या घरी उपलब्ध असलेले साहित्य लागते, हीच या पदार्थाची मूळ विशेषता आहे. बटाट्याचा कीस या पदार्थात बटाटा भाजीचा समावेश असल्यामुळे आणि बहुतेक जणांचा बटाटा आवडता असल्यामुळे हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा बेत ठरू शकतो. कोकण विभागात खेडेगावांमध्ये बटाट्याचा कीस हा पदार्थ देखील उपवासाच्या दिवशी उपवासाचा पदार्थ म्हणून गृहिणी बनवतात आणि साबुदाण्याच्या खिचडी बरोबर बटाट्याचा कीस हा पदार्थ देखील विशेष प्रसिद्ध आहे. बटाट्याचा कीस या पदार्थाची चव फार उत्कृष्ट असून हा लवकर होणारा पदार्थ असल्यामुळे साबुदाण्याची खिचडी किंवा इतर उपवासाचे किचकट पदार्थ बनवण्यासाठी लागणारा वेळ देखील वाचतो.

साहित्य :

१) तूप
२) पाच ते सहा कढीपत्त्याची पाने
३) चार ते पाच बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या
४) चार ते पाच बटाटी
५) पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट
६) मीठ
७) साखर
८) पाव चमचा लिंबाचा रस

कृती :

१) बटाटयाचा कीस बनवण्यासाठी सर्वप्रथम चार ते पाच बटाटी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतर या बटाटयांची साल काढून किसणीच्या साहाय्याने बटाटी व्यवस्थितपणे बारीक किसून घ्या.
२) अशा पद्धतीने बटाटी बारीक किसून घेतल्यानंतर बटाट्याचा बारीक झालेला कीस एका बाजूला एका टोपात पाणी घेऊन त्या पाण्यात हा कीस भिजवून दोन ते तीन वेळा व्यवस्थित धुवून घ्या आणि नंतर पाण्यात भिजत ठेवा, जेणेकरून या बटाट्याच्या कीसाचा रंग लालसर होणार नाही आणि बटाट्यातील सफेद रंगाचे स्टार्च देखील त्यातून निघून जाईल.
३) नंतर गॅस चालू करून गॅसवर एक कढई ठेवा, कढई चांगली तापल्यानंतर गॅस मंद आचेवर करून कढईत चार ते पाच चमचे तूप घाला, तूप वितळून सुगंध आल्यानंतर त्यात पाच ते सहा कढीपत्त्याची पाने, अर्धा चमचा जिरे आणि चार ते पाच बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घाला. फोडणी व्यवस्थित परतून घ्या. फोडणी अजिबात करपू देऊ नका, फोडणीतील कढीपत्ता, जिरे आणि मिरच्या व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात चार ते पाच बटाट्यांचा पाणी गाळून घेतलेला कीस घाला आणि नंतर त्यात पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट घालून त्यात चवीनुसार मीठ, आवडीनुसार किंचित गोडपणा येण्यासाठी अर्धा चमचा साखर घालून हे सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. मग कढईवर झाकण ठेवून बटाटयाचा कीस वाफेवर शिजण्यासाठी ठेवून द्या. बटाटयाचा कीस वाफेवर अगदी व्यवस्थित शिजतो, त्यामुळे त्यात अजिबात पाणी घालू नका.
४) त्यानंतर २ मिनिटांनी कढईवरील झाकण काढून बटाट्याच्या कीसमध्ये किंचित आंबट चवीसाठी पाव वाटी लिंबाचा रस घालून हा कीस पुन्हा ढवळून त्यावर झाकण लावून ४ ते ५ मिनिटांसाठी वाफेवर शिजण्यासाठी ठेवून द्या. बटाटयाचा कीस शिजला आहे की नाही हे तपासून बघण्यासाठी तो चमच्यावर घेऊन बोटाने दाबून बघा, जर बटाट्याचा कीस दाबून बघितल्यावर नरम लागला तर तो व्यवस्थित शिजला आहे, अशी आपल्याला खात्री करून घेता येईल, मग गॅस बंद करा.
५) अशा तऱ्हेने चवदार, किंचित आंबट-गोड-तिखट या संमिश्र पद्धतीचा बटाट्याचा गरमागरम कीस हा उपवासाचा पदार्थ खाण्यासाठी तयार होईल.

चव :

किंचित आंबट, गोड, तिखट पण अतिशय चवदार