मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

मेथीची भाजी (मेथीची भाजी, मेथीची भाजी दाखवा, मेथीची भाजीची रेसिपी, मेथीची भाजी कशी बनवतात, मेथीची भाजी कशी करतात, मेथीची भाजी खाण्याचे फायदे, मेथीची भाजी रेसिपी मराठी, मेथीची भाजी ची माहिती, मेथीची भाजी कशी करावी, मेथीची भाजी बनवणे)

मेथीची भाजी

मेथीची भाजी (मेथीची भाजी, मेथीची भाजी दाखवा, मेथीची भाजीची रेसिपी, मेथीची भाजी कशी बनवतात, मेथीची भाजी कशी करतात, मेथीची भाजी खाण्याचे फायदे, मेथीची भाजी रेसिपी मराठी, मेथीची भाजी ची माहिती, मेथीची भाजी कशी करावी, मेथीची भाजी बनवणे)
मेथीची भाजी (ओल्या खोबऱ्याशिवाय)

मेथीची भाजी (मेथीची भाजी, मेथीची भाजी दाखवा, मेथीची भाजीची रेसिपी, मेथीची भाजी कशी बनवतात, मेथीची भाजी कशी करतात, मेथीची भाजी खाण्याचे फायदे, मेथीची भाजी रेसिपी मराठी, मेथीची भाजी ची माहिती, मेथीची भाजी कशी करावी, मेथीची भाजी बनवणे)
मेथीची भाजी (ओल्या खोबऱ्यासहित)

Links To Read Blog In Other Languages On Methichi Bhaji :

पदार्थाविषयी माहिती :

मेथीची भाजी हा पदार्थ चवीला अतिशय कडू असला तरी देखील या भाजीमध्ये जास्त प्रमाणात शरीरासाठी आवश्यक असणारे फायदेशीर पोषक घटक असतात. मेथी ही एक हिरवी पालेभाजी असून ही मेथीची पाने आणि मेथीच्या बिया या दोन्ही रूपांमध्ये जेवणात वापरली जाऊ शकते. मेथीची भाजी बनवण्यासाठी मेथीची पाने वापरली जातात. तर मेथीच्या बियांचा वापर हा जेवणात मसाल्याचा पदार्थ म्हणून देखील करता येतो. आयुर्वेदामध्ये मेथीची भाजी ही अनेक रोगांवर, आजारांवर रामबाण उपाय मानली जाते, म्हणून वैद्य आपल्या रुग्णांना आहारात मेथीच्या भाजीचा समावेश करण्याचा सल्ला नेहमी देत असतात. मेथीची भाजी आणि मेथीच्या बिया यांची चव कडवट असते, परंतु तितकेच या भाजीचे महत्व अधिक आहे. कोकण विभागात मेथीची भाजी ही नाश्त्याला किंवा जेवणात अत्यंत सोप्या पद्धतीने तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवली जाते, मेथीची भाजी ही अतिशय पौष्टिक असून ती भाकरीसोबत फार चविष्ट लागते.  

विशेषता :

इतर देशांबरोबरच भारतात देखील मेथीच्या भाजीचे उत्पादन हे फार मोठ्या प्रमाणावर होते. भारतातील राजस्थान राज्यात मेथीचे मोठ्या सर्वात जास्त उत्पादन होते. तर हिवाळ्यात मेथीच्या भाजीच्या उत्पादनाचे प्रमाण हे अधिक असते. मेथीच्या भाजीत अँटिऑक्सिडंट असल्यामुळे कर्करोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब या रोगांना आळा घालण्यास मदत होते. याशिवाय मेथीची भाजी ही हृदयाच्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त असून पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी मदत करते. मेथीच्या भाजीचा आपल्या आहारात नियमितपणे समावेश केल्याने भूक वाढते. मेथीच्या भाजीची विशेषता अशी की ही भाजी अतिशय पौष्टिक असून झटपट होणाऱ्या भाज्यांपैकी एक आहे आणि कोकणात तांदळाच्या किंवा नाचणीच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या गरमागरम भाकऱ्यांसोबत खाण्यासाठी मेथीची भाजी ही बहुतकरून बनवली जाते. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात मेथीची भाजी आणि भाकरी हा बहुतेक लोकांचा आवडता आहार आहे.    

साहित्य :

१) तेल
२) सात ते आठ कढीपत्त्याची पाने
३) दोन बारीक चिरलेले कांदे
४) दोन ते तीन भाग करून घेतलेल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या
५) दोन जुड्या मेथीची भाजी
६) पाणी
७) मीठ
८) एक वाटी ओले खोबरे 

कृती :

१) मेथीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम दोन जुड्या मेथीची पालेभाजी घ्या. त्यानंतर या दोन्ही मेथीच्या जुड्या व्यवस्थित साफ करून घेण्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये मेथीच्या भाजीची पाने काढून घ्या. 

२) मेथीच्या भाजीची हिरवी पाने पाण्यात स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून त्यातील माती निघून जाईल.

३) त्यानंतर या मेथीच्या भाजीची हिरवी पाने विळीच्या किंवा सुरीच्या साहाय्याने बारीक चिरून घ्या.

४) अशा पद्धतीने एकदा मेथीची भाजी बारीक चिरून घेतल्यानंतर नंतर गॅस चालू करून त्यावर एक मोठी कढई ठेवा. कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल घाला. तेल चांगले तापल्यानंतर त्यात दोन ते तीन भाग करून घेतलेल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ कढीपत्त्याची पाने घाला. तेलात घातलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता करपू नये म्हणून गॅस थोडा कमी करा. मिरच्या व्यवस्थित भाजल्यानंतर आणि कढीपत्त्याचा सुगंध आल्यानंतर त्यात दोन बारीक चिरलेले कांदे घाला. ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घ्या. कांदा लालसर होईपर्यंत तेलात व्यवस्थित भाजून घ्या. 

५) कांदा तेलात लालसर झाल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी घाला. भाजी घालताना त्यात पाणी असणार नाही याची विशेष काळजी घ्या, कारण पालेभाजी ही वाफेवर योग्य पद्धतीने शिजते. मग भाजीमध्ये चवीनुसार मीठ घाला आणि भाजी व्यवस्थित ढवळून घ्या, जेणेकरून भाजीत सर्वत्र मीठ अगदी बरोबर लागेल.

६) त्यानंतर गॅस मंद आचेवरच ठेवून कढईच्या तोंडावर झाकण ठेवून मेथीची भाजी वाफेवर दहा ते पंधरा मिनिटे शिजवून घ्या. मेथीची भाजी शिजण्यासाठी ठेवल्यावर तिला आपोआपच पाणी सुटेल आणि वाफेवर ती अगदी योग्य प्रकारे शिजेल, त्यामुळे ती शिजवण्यासाठी त्यात अजिबात पाणी घालू नका. मेथीची भाजी शिजताना त्यात चरचर असा आवाज देखील होईल, त्यावरून आपणांस हे लक्षात येईल की मेथीची भाजी अजूनही शिजत आहे.    

७) मेथीची भाजी बनवताना ती पटकन होण्यासाठी आपण गॅस किंचित वाढवू शकतो, परंतु ती करपून जाण्याची शक्यता जास्त असते. कारण सर्व गृहिणींना हे ठाऊकच असेल की वाफेवर कोणतीही भाजी अगदी पटकन शिजते. मेथीची भाजी नीट चरचरली की त्यातील पाणी निघून जाते, त्यामुळे एकदा भाजी शिजली की त्यातून भाजी चरचरण्याचा आवाज येणार नाही.     

८) मेथीच्या भाजीचा दोन प्रकारे आस्वाद घेता येऊ शकतो, एक म्हणजे मेथीची भाजी ही चवीला कडू असल्यामुळे ज्यांना कडवट भाजी खाण्यासाठी आवडत नसेल तर त्यांच्यासाठी मेथीच्या भाजीमध्ये कातलेले ओले खोबरे घालता येईल, त्यामुळे भाजीतील कडवटपणा निघून जाईल आणि दुसरे म्हणजे मेथीची भाजी ही ओल्या खोबऱ्याशिवाय देखील अतिशय चवदार लागते, त्यामुळे मेथीची भाजी व्यवस्थित शिजल्यानंतर तिचा गरमागरम भाकरीसोबत आस्वाद घेता येऊ शकतो. जेवणात ओल्या खोबऱ्याचा समावेश असणे ही कोकणाची खासियत आहे, त्यामुळे मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यात वरून बारीक कातलेले एक वाटी ओले खोबरे घाला आणि मेथीची भाजी व्यवस्थित ढवळून गॅस बंद करा. अशा प्रकारे शरीरासाठी पौष्टिक अशी मेथीची भाजी गरमागरम भाकरीसोबत खाण्यास तयार होईल.

चव :

पौष्टिक आणि चवदार