मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

मुळ्याची भाजी (मुळ्याची भाजी, मुळ्याची भाजी कशी बनवायची, मुळ्याची भाजी रेसिपी, मुळ्याची भाजी कशी करायची, मुळ्याची भाजी कशी करतात, मुळ्याची भाजी ची रेसिपी, मुळ्याची भाजी in marathi, मुळा भाजी रेसिपी, मुळ्याच्या भाजीची रेसिपी)

मुळ्याची भाजी

मुळ्याची भाजी (मुळ्याची भाजी, मुळ्याची भाजी कशी बनवायची, मुळ्याची भाजी रेसिपी, मुळ्याची भाजी कशी करायची, मुळ्याची भाजी कशी करतात, मुळ्याची भाजी ची रेसिपी, मुळ्याची भाजी in marathi, मुळा भाजी रेसिपी, मुळ्याच्या भाजीची रेसिपी)
मुळ्याची भाजी

Links To Read Blog In Other Languages On Mulyachi Bhaji :

Blog On Mulyachi Bhaji In English

पदार्थाविषयी माहिती :

मुळ्याची भाजी हा पदार्थ अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे. मुळा ही एक हिरवी पालेभाजी आहे. आपल्या सर्वांना हे माहीत असेल की हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने त्यातून शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जीवनसत्त्व मिळते, कारण हिरव्या पालेभाज्यांमध्ये काही महत्वाचे पोषक घटक असतात. मुळा पालेभाजी ही कॅल्शियम आणि पोटॅशियम यांच्यासारख्या अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजांनी समृध्द असते तर मुळा पालेभाजीमध्ये काही प्रमाणात अ आणि क ही जीवनसत्त्वे असतात. मुळा पालेभाजीमध्ये हे सर्व पोषक घटक एकत्रितपणे सामाविष्ट असल्यामुळे उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात. मुळा पालेभाजी हा नैसर्गिक नायट्रेट्सचा एक चांगला स्रोत आहे ज्यामुळे रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते. मुळा पालेभाजी यापासून मुळ्याची भाजी, मुळ्याची कोशिंबीर इत्यादी पदार्थ बनवले जातात, परंतु कोकण विभागात मुळ्याची भाजी ही तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे.

विशेषता :

मुळा पालेभाजीचे पीक हे विशेषतः थंड हवामानात म्हणजे हिवाळ्यात घेतले जाणारे पीक असून त्याची लागवड रबी हंगामात केली जाते, परंतु उष्ण हवामानात चांगल्या प्रकारे वाढू शकणाऱ्या मुळा पालेभाजीच्या जाती विकसित झाल्यामुळे या पिकाची लागवड वर्षभर देखील होऊ शकते. कोकणात मुळ्याची भाजी ही तांदळाच्या पिठाच्या भाकरीसोबत जास्त करून बनवली जाते, मुळ्याची भाजी ही तांदळाच्या, नाचणीच्या भाकरीसोबत अत्यंत चविष्ट लागते. मुळा ही पालेभाजी बारा महिने उपलब्ध असते, त्यामुळे गृहिणी भाकरीसोबत मुळ्याच्या भाजीचा बेत अगदी आवडीने सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी आणि रात्री जेवणाच्या वेळेस करू शकतात. मुळा भाजीचे खूप फायदे आहेत आणि हीच या भाजीची प्रमुख विशेषता आहे, त्यामुळे मुळ्याची भाजी खाल्ल्याने शरीरातील रोप्रतिकारक शक्ती वाढते आणि मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी मुळ्याच्या भाजीचा आहारात समावेश असणे हा या आजारावरील एक उत्तम उपाय आहे. 

साहित्य :

१) तेल
२) सात ते आठ कढीपत्त्याची पाने
३) दोन बारीक चिरलेले कांदे
४) दोन ते तीन भाग करून घेतलेल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या
५) दोन जुड्या मुळ्याची भाजी
६) पाणी
७) मीठ
८) एक वाटी ओले खोबरे

कृती :

१) मुळ्याची भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिला दोन जुड्या मुळ्याची पालेभाजी घ्या. त्यानंतर या दोन्ही मुळ्याच्या जुड्या व्यवस्थित साफ करून घेण्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये मुळ्याच्या भाजीची पाने काढून आणि भाजीला असणारा सफेद रंगाचा मुळा पानांपासून वेगळा करून घ्या. 
२) मुळ्याच्या भाजीची हिरवी पाने आणि सफेद मुळा यांना पाण्यात स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून त्यातील माती निघून जाईल.
३) मग ही मुळ्याच्या भाजीची हिरवी पाने कोवळ्या देठांसकट विळीच्या किंवा सुरीच्या साहाय्याने बारीक चिरून घ्या आणि सफेद मुळा देखील फार पौष्टिक असतो, त्यामुळे त्याचे देखील उभे चार भाग करून नंतर त्यांना आडवे बारीक कापून घ्या. 
४) अशा पद्धतीने एकदा मुळ्याची भाजी बारीक चिरून घेतल्यानंतर मुळ्याच्या पानांची हिरवी भाजी आणि बारीक कापून घेतलेला सफेद मुळा यांना पहिल्यांदा वेगवेगळ्या ताटात ठेवा. नंतर मुळ्याची चिरलेली भाजी आणि बारीक कापलेला मुळा यावर चवीनुसार थोडं मीठ घालून ते मिठाने चुरून घ्या, ज्यामुळे त्यात मीठ व्यवस्थित मुरून त्याला हळू हळू पाणी सुटेल. (मुळ्याच्या भाजीची चिरून घेतलेली हिरवी पाने आणि बारीक कापलेला मुळा ही भाजी कधीही मेथी, पालक, लालमाठ या पालेभाज्यांप्रमाणे पाण्याने धुवून घेतली जात नाही तर ती मिठाने चुरून घेतली जाते, याचे मुख्य कारण असे की या भाजीत तंतूंचे प्रमाण जास्त असल्यामळे या भाजीत शिजवताना मीठ घातले तर ते भाजीला व्यवस्थित लागत नाही आणि परिणामी भाजी अळणी बनते. म्हणून मुळ्याची भाजी ही नेहमी थोडे मिठ घालून चुरून घ्यावी. ) मग या भाजीतील पाणी काढून टाका.
५) नंतर गॅस चालू करून त्यावर एक मोठी कढई ठेवा. कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल घाला. तेल चांगले तापल्यानंतर त्यात दोन ते तीन भाग करून घेतलेल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ कढीपत्त्याची पाने घाला. तेलात घातलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता करपू नये म्हणून गॅस थोडा कमी करा. मिरच्या व्यवस्थित भाजल्यानंतर आणि कढीपत्त्याचा सुगंध आल्यानंतर त्यात दोन बारीक चिरलेले कांदे घाला. ही सर्व फोडणी व्यवस्थित परतून घ्या. कांदा लालसर होईपर्यंत तेलात व्यवस्थित भाजून घ्या. 
६) कांदा तेलात लालसर झाल्यानंतर त्यात मिठाने चुरून घेतलेली आणि नंतर भाजीला सुटलेले पाणी काढून घेतलेली मुळ्याची भाजी घाला. भाजी घालताना त्यात पाणी असणार नाही याची विशेष काळजी घ्या, कारण पालेभाजी ही वाफेवर योग्य पद्धतीने शिजते. यानंतर भाजीमध्ये मीठ घालताना ते जास्त घालू नका कारण सुरुवातीला भाजी चुरून घेताना आपण मिठाचा वापर केला होता त्यामुळे भाजीत योग्य अंदाजाने चवीनुसार थोडेच मीठ घाला आणि भाजी व्यवस्थित ढवळून घ्या, जेणेकरून भाजीत सर्वत्र मीठ अगदी बरोबर लागेल.
७) त्यानंतर गॅस मंद आचेवरच ठेवून कढईच्या तोंडावर झाकण ठेवून मुळ्याची भाजी वाफेवर दहा ते पंधरा मिनिटे शिजवून घ्या. मुळ्याची भाजी शिजण्यासाठी ठेवल्यावर तिला आपोआपच पाणी सुटेल आणि वाफेवर ती अगदी चांगल्या प्रकारे शिजेल, त्यामुळे ती शिजवण्यासाठी त्यात अजिबात पाणी घालू नका. मुळ्याची भाजी शिजताना त्यात चरचर असा आवाज देखील होईल, त्यावरून आपणांस हे लक्षात येईल की मुळ्याची भाजी अजूनही शिजत आहे.    
८) मुळ्याची भाजी बनवताना ती पटकन होण्यासाठी आपण गॅस किंचित वाढवू शकतो, परंतु ती करपून जाण्याची शक्यता जास्त असते. कारण सर्व गृहिणींना हे ठाऊकच असेल की वाफेवर कोणतीही भाजी अगदी पटकन शिजते. मुळ्याची भाजी नीट चरचरली की त्यातील पाणी निघून जाते, त्यामुळे एकदा भाजी शिजली की त्यातून भाजी चरचरण्याचा आवाज येणार नाही. मुळ्याची भाजी व्यवस्थित शिजली आहे की नाही याची जर खात्री करून घ्यायची असेल तर भाजीतील सफेद मुळा चमच्यात घेऊन तो बोटाने चिलटून बघा, जर मुळा नरम लागला तर भाजी अगदी उत्तम प्रकारे शिजली आहे, असे म्हणता येईल.     
९) मुळ्याची भाजी शिजल्यानंतर त्यात वरून बारीक कातलेले एक वाटी ओले खोबरे घाला आणि मुळ्याची भाजी व्यवस्थित ढवळून गॅस बंद करा. अशा प्रकारे चविष्ट आणि शरीरासाठी पौष्टिक अशी मुळ्याची भाजी गरमागरम भाकरीसोबत खाण्यास तयार होईल. 

चव : 

रुचकर आणि चविष्ट