मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

उकडीचे मोदक (उकडीचे मोदक, उकडीचे मोदक कसे बनवतात, उकडीचे मोदक कसे करायचे, उकडीचे मोदक बनवण्याची रेसिपी, उकडीचे मोदक ची रेसिपी, उकडीचे मोदक रेसिपी इन मराठी, उकडीचे मोदक रेसिपी मराठी)

उकडीचे मोदक

उकडीचे मोदक (उकडीचे मोदक, उकडीचे मोदक कसे बनवतात, उकडीचे मोदक कसे करायचे, उकडीचे मोदक बनवण्याची रेसिपी, उकडीचे मोदक ची रेसिपी, उकडीचे मोदक रेसिपी इन मराठी, उकडीचे मोदक रेसिपी मराठी)
उकडीचे मोदक 

Links To Read Blog In Other Languages On Ukadiche Modak :

Blog On Ukadiche Modak In English

पदार्थाविषयी माहिती :

उकडीचे मोदक हा केवळ एक पदार्थ नसून आपल्या निरस आणि बेचव आयुष्यात गोडवा आणणारे निर्मळ सुख आहे. आपण सर्वांना हे चांगले ठाऊक असेलच की उकडीचे मोदक हे कोकणात विशेष प्रसिद्ध असून गणपती बाप्पाला किती प्रिय आहेत. उकडीच्या मोदकाचे नुसते नाव जरी ऐकू आले तर सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाचा सहज भुरळ पडेल असा गोंडस, हसतमुख चेहरा डोळ्यांसमोर येतो आणि मोदकाच्या विचारानेच मन अगदी तृप्त होऊन जाते. उकडीचे मोदक हा असा पदार्थ आहे जो चेहऱ्यावर हास्य आणि मुखात मधासमान गोडवा आणतो. उकडीचे मोदक हे फक्त गणेशोत्सवात बनवले जात नाहीत तर सणासमारंभाला, श्रीगणेश चतुर्थीला, संकष्टीला देखील घरोघरी मोठ्या आवडीने आणि हौसेने बनवले जातात.     

विशेषता :

कोकण भागात घराघरात गणेशोत्सवाला गणपती आगमनाच्या प्रथम दिवशी गणपती बाप्पाला त्याच्या आवडीचा नैवेद्य म्हणून उकडीच्या मोदकांचा खाशी बेत असतो. एवढेच नाही तर सणासुदीला तिखट जेवणाबरोबर गोडाचा पदार्थ म्हणून शिरा किंवा खीर यांच्याऐवजी उकडीचे मोदक अगदी सहजपणे बनवता येऊ शकतात आणि बहुतेक लोकांना उकडीचे मोदक खायला अधिक आवडतात. जगात दुर्मिळ आनंदाचा आस्वाद घ्यायचा असेल तर उकडीचे मोदक हा त्यावर उत्तम खाद्याचा बेत आहे, कारण उकडीचे मोदक खाताच मन अगदी आनंदून जाते आणि सारा शीण दूर निघून जातो, हीच उकडीचे मोदक या पदार्थाची विशेष खासियत आहे.     

साहित्य :

१) तेल किंवा तूप 
२) ओले खोबरे 
३) गूळ 
४) वेलची 
५) मीठ
६) पाणी
७) खोबरेल तेल 
८) तांदळाचे पीठ 

कृती :

१) उकडीचे मोदक बनव्यासाठी सुरुवातीला मोदकाचे सारण बनवण्याकरीता विळीच्या साहाय्याने दोन वाटी कातून घेतलेले ओले खोबरे घ्या. दोन वाटी ओल्या खोबऱ्यात पाव किलो गूळ बारीक किसून घाला, हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. 
२) त्यानंतर गॅसवर एक मोठा टोप ठेवा, गॅस मंद आचेवर ठेवून टोपात दोन ते तीन चमचे तेल किंवा आवडीनुसार तूप घाला. तेल किंवा तूप गरम झाल्यानंतर त्यात ओले खोबरे आणि त्यात टाकलेला गूळ यांचे मिश्रण घाला. नंतर त्यात पाच ते सहा वेलचींची बारीक केलेली पूड घाला. हे सर्व मिश्रण लालसर होईपर्यंत आणि त्यातील गूळ खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मुरेपर्यंत तेलात किंवा तूपात व्यवस्थित भाजून घ्या.
३) मोदक बनवण्यासाठी आवश्यक असलेले ओले खोबरे आणि गूळ यांचे सारण तयार झाले की ते थोडे थंड होऊ द्या. 
४) मग एक मोठी परात घेऊन त्यात अर्धा चमचा मीठ, अर्धा किलो तांदळाचे पीठ घ्या. या पिठात थोडे थोडे गरम पाणी घालून ते व्यवस्थित ढवळून घ्या. मग पीठ थंड झाल्यावर त्यात थोडे थोडे अंदाजाने पाणी घालून ते व्यवस्थित मळून घ्या.
५) पीठ व्यवस्थित मळून झाल्यावर मळलेल्या पिठातून थोडेसे पीठ घ्या, त्याचा हातावर गोलाकार गोळा बनवून घ्या. नंतर हाताला थोडेसे तांदळाचे पीठ लावून त्या गोळ्यापासून खोलगट पणतीच्या आकाराची गोलाकार पाती बनवून घ्या. 
६) खोलगट पाती बनवल्यानंतर त्यात चमच्याने थोडे सारण घाला, नंतर या पातीला सर्व बाजूंनी बोटाच्या साहाय्याने चिमटीत दुमडून त्याला गोल फिरवून वर टोक काढून मोदकाची पाती बंद करून घ्या. अशा पद्धतीने एकसमान अनेक मोदक बनवून घ्या. 
७) एकदा मोदक बनवून झाल्यानंतर ते उकडीला ठेवण्यासाठी गॅसवर एक मोठा टोप ठेवा, त्यात एक ते दीड ग्लास पाणी घाला. त्यावर मोदक उकडण्यासाठी वापरली जाणारी बारीक होलांची चाळण ठेवा. त्या चाळणीला आतून खोबरेल तेल लावून घ्या आणि त्यावर बनवलेले मोदक ठेवा. चाळणीच्या वर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटांसाठी मोदक उकडून घ्या आणि मग गॅस बंद करा. 
८) अशा प्रकारे स्वादिष्ट, खमंग आणि गरमागरम उकडीचे मोदक खाण्यासाठी तयार होतील. मोदक खाताना त्यावर आवडीनुसार तूपाची धार सोडता येईल आणि केशरी, पिवळसर रंगासाठी केशर देखील मोदकावर वापरता येईल.    

चव :

स्वादिष्ट आणि गोड