मुख्य सामग्रीवर वगळा

Amazon Ads

आमच्याविषयी माहिती

आमच्याविषयी माहिती

Read About Us In English Language

भारत देशातील कोकण प्रांत❤ हा भारताला लाभलेला पश्चिम समुद्रकिनारा आणि पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेल्या सह्याद्री डोंगररांगेच्या मध्यभागात असलेला एक लांब विस्तीर्ण पट्टा आहे. सुमारे ७२० कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आणि महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येणाऱ्या अपार सौंदर्याने नटलेल्या आणि नारळाची झाडे, हापूस आंबे, सुपारी आणि केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारावर केलेली भातशेती या जैवविविधतेने आणि निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण अशा स्वर्गरूपी कोकणात सर्व वाचकांचे सहर्ष स्वागत🙏....

येवा कोकण आपलोच असा 😍....    

कोकणी कट्टा सुप्रसिद्ध पदार्थ ही ब्लॉगर वेबसाईट पूर्णतः कोकणातील प्रसिद्ध असलेल्या खाद्यपदार्थांवर आधारलेली आहे. कोकणी कट्टा सुप्रसिद्ध पदार्थ यावर आलेल्या सर्व वाचकांना कोकण वासियांचे सर्वप्रथम विनम्र अभिवादन 😊🙏  

कोकणी कट्टा सुप्रसिद्ध पदार्थ या ब्लॉगवर कोकण विभागात विशेष प्रसिद्ध असणाऱ्या सर्व खाद्यपदार्थांविषयी माहिती, पदार्थांची विशेषता, पदार्थ बनवण्याची कृती सर्व वाचकांसाठी पोस्ट्सद्वारे उपलब्ध आहे. कोकणात घराघरात बनवले जाणारे गोड, तिखट, आंबट इत्यादी मिश्र चवींचे पदार्थ कसे बनवले जातात, याविषयीची सर्व माहिती कोकणी कट्टा सुप्रसिद्ध पदार्थ ब्लॉगवर शेअर केलेल्या पोस्ट्समध्ये सविस्तर कृतीसह वाचायला मिळेल. कोकणात बनवल्या जाणाऱ्या अधिक पदार्थांविषयी जाणून घेण्यासाठी कोकणी कट्टा सुप्रसिद्ध पदार्थ ब्लॉगला नियमितपणे भेट द्या. आणखी पोस्टच्या अद्यतनांसाठी कोकणी कट्टा सुप्रसिद्ध पदार्थ या आपल्या ब्लॉगच्या संपर्कात रहा!